|Thursday, November 21, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. 3 ते 9 नोव्हेंबर 2019                                                   

मेष

4 नोव्हेंबर, सोमवार रोजी गुरु महाराज धनु राशीत प्रवेश करीत आहेत. तुळेत बुध वक्री होत आहे. या वर्षात तुम्हाला गुरुबळ लाभेल. धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. गोड बोलून तुम्हाला  फसवण्याचा डाव तुम्ही ओळखा. घरात तणाव होईल. स्वत:च्या खाण्याची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. कोर्टकेस जिंकण्याची आशा वाटेल. नोकरी मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.


वृषभ

गुरु ग्रह 4 नोव्हेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. या वर्षात गुरु बल कमी प्रमाणात तुम्हाला लाभेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन कोणताही मोठा निर्णय तुम्ही घ्या. धंद्यात लक्ष द्या. वाद वाढवू नका. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक होऊ देऊ नका. राजकीय, सामाजिक  कार्यात वरि÷ांच्या मतानुसार वागावे लागेल. घरगुती कामे करून घ्या. स्पर्धा कठीण आहे.


मिथुन

सोमवार 4 नोव्हेंबर रोजी गुरु ग्रहाचे धनु राशीत होणारे आगमन तुम्हाला योग्य दिशा देणारे ठरेल. गुरुबळ लाभेल. तुळेत बुध वक्री होत आहे. धंद्यात फायदा वाढवता येईल.  मोह जास्त ठेवू नका. घरगुती जीवनात खर्च वाढेल. तडजोड करा. चिडचिड नको. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. पद मिळेल. कोर्टकेसमध्ये आशादायक वातावरण राहील. स्पर्धेत प्रगती होईल.


कर्क

धनु राशीत 4 नोव्हेंबर रोजी गुरु महाराज प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. प्रवासात घाई नको. रागावर ताबा ठेवा. धंद्यात प्रगती होईल. नवीन ओळख होईल. घरगुती तणाव कमी होईल. मनाप्रमाणे घटना घडण्यासाठी संयम ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात पदाची शक्मयता वाढेल. सहकारी मदत करतील. नोकरीत तडजोड ठेवा.थकबाकी वसूल करा.


सिंह

सिंह राशीच्या पंचमात म्हणजे धनु राशीत गुरु ग्रह 4 नोव्हेंबर रोजी प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. तुम्ही घेतलेल्या परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यास प्रतिप्रतिष्ठा  मिळेल. मुले प्रगती करतील. जवळचे लोक तुमच्यावर आरोप करण्याची शक्मयता आहे. धंद्यात मोठे काम मिळवा. मागे राहू नका. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.


कन्या

4 नोव्हेंबर सोमवार रोजी धनु राशीत गुरु ग्रहांचे राश्यांतर होत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. घरासंबंधी प्रश्न सोडवणे गरजेचे राहील. धंद्यात वाढ करता येईल. कायदा सर्वत्र पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. तुम्ही लोकांचा अभ्यास करा. म्हणजे निर्णय घेण्यात यश मिळेल. मोह आवरा, घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. नोकरीत फायदेशीर बदल होऊ शकेल. कोर्टकेस जिंकाल. स्पर्धेत पुढे जाल.


तुळ

सोमवार 4 नोव्हेंबर रोजी धनु राशीत येणारा गुरु तुमच्या जीवनाला कलाटणी देईल. इच्छा आकांक्षा पूर्ण करेल. त्यादृष्टीने प्रयत्न करा. धंद्यात मोठे काम मिळेल. पैसे गुंतवणे महत्त्वाचे ठरेल. नोकरी मिळेल. लग्न, संतती प्राप्तीचा योग जुळवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात  प्रतिष्ठा  मिळेल. कर्जाचे काम होईल. कोर्टकेस जिंकाल, आवडत्या क्षेत्रात प्रगती कराल.


वृश्चिक

धनु राशीत गुरु ग्रहाचा प्रवेश 4 नोव्हेंबररोजी होत आहे. साडेसाती संपण्याच्या मार्गावर आहे. धंद्यात चांगली स्थिती निर्माण होण्यास सुरुवात होईल. नोकरीत वरिष्ठा ची मर्जी राखा. घरात जबाबदारी वाढेल. खाण्याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात टिका होईल. तुमच्या चुका दिसतील. आर्थिक व्यवहार जपून करा. चिंतेपेक्षा चिंतन करा. स्पर्धेत टिकून रहा. वाहन जपून चालवा. खर्च वाढेल.


धनु

तुमच्याच राशीत 4 नोव्हेंबर रोजी गुरु महाराज प्रवेश करीत आहे. गुरुबल लाभेल. तुळेत बुध वक्री होत आहे. खर्चावर बंधन घालावे लागेल. खाण्याची काळजी घ्या. आपसात क्षुल्लक वाद होईल. धंद्यात वाढ करता येईल. गोड बोलणाऱया व्यक्तीवर मोठा भरवसा ठेऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात उत्तम प्रगती करता येईल. नोकरी मिळेल. कोर्टकेस मार्गी लागेल. स्पर्धेत प्रगती होईल. मित्र विचित्र वागतील.


मकर

तुम्हाला साडेसाती सुरू आहे. 4 नोव्हेबररोजी धनु राशीत गुरु महाराज प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. आत्मबल टिकून राहील. भलत्या व्यक्तीचा सल्ला घेणे धोकादायक ठरेल. नोकरी लवकर मिळवा. धंद्यात फायदा होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. अंदाज यापुढे नीट घ्यावा लागेल. घर खरेदी, विक्री करता येईल. कायदा पाळा. कोर्टकेस संपवा. स्पर्धा जिंकाल. व्यसनात वेळ, पैसा फुकट जाईल.


कुंभ

4 नोव्हेंबररोजी गुरु महाराज धनु राशीत प्रवेश करीत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला संताप होईल.  वाहन जपून चालवा. दुखापत होऊ शकते. धंद्यात मोठा बदल करता येईल. फायदा वाढेल. येणे वसूल करा. घर, जमीन खरेदी करता येईल. नोकरी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात अधिकार मिळेल. उत्साहवर्धक घटना घडेल. कोर्टकेस लवकर संपवा. स्पर्धेत पुरस्कार मिळवाल.


मीन

गुरु ग्रहाचे राश्यांतर धनु राशीत 4 नोव्हेंबररोजी होत आहे. तुळेत बुध वक्री होत आहे. मैत्री वाढेल.  कुणावर विश्वास  जास्त ठेवू नका. धंद्यात काम मिळेल. व्यवहार सावधपणे करा. नोकरीत तणाव वाढू देऊ नका. घरगुती संबंध चांगले ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येईल. नम्र रहा. स्पर्धेत कठीण प्रसंगावर मात करा. कोर्टकेसमध्ये बोलतांना सावध रहा.

Related posts: