|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बळ्ळारी नाल्यात अतिक्रमण करून बांधलेली भिंत कोसळून पिकांचे नुकसान

बळ्ळारी नाल्यात अतिक्रमण करून बांधलेली भिंत कोसळून पिकांचे नुकसान 

प्रतिनिधी/ बेळगाव

जुने बेळगावनजीक बळ्ळारी नाल्यात अतिक्रमण करून बांधण्यात आलेली भिंत शनिवारी कोसळली आहे. नाल्यात पडलेल्या भिंतीमुळे पाण्याचा प्रवाह शेतात जाऊन पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. यंदा धुव्वाधार झालेल्या पावसामुळे बळ्ळारी नाल्याजवळील शेकडो एकर जमीन पाण्याखाली जाऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामध्ये भर म्हणून बळ्ळारी नाल्यात अतिक्रमण करून बांधण्यात आलेली भिंत कोसळून पिकाचे नुकसान होत आहे. तसेच परिसरातील शेतवाडीत मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी सुटून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर बेकायदेशीर बांधकामाची पाहणी करून शेतकऱयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Related posts: