20 हून अधिक जि.पं. सदस्य देणार कॉंग्रेसला हात?

माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांची घेतली भेट
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात डिसेंबर मध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. यामध्ये गोकाकचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर गोकाकचे माजी आमदार व मंत्री रमेश जारकीहोळी यांनी कंबर कसली आहे. तालुक्मयातील काही कॉंग्रेसच्या सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याच धर्तीवर बेळगाव जिल्हा पंचायतच्या सुमारे 20 सदस्यांनी गोकाक येथे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली आहे. यामुळे हे जि. पं. सदस्यही कॉंग्रेसला हात देणार का, अशी जोरदार चर्चा जिह्यात सुरू आहे.
20 हून अधिक जि. पं. सदस्य कॉंग्रेसला रामराम ठोकुन भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा शनिवारी गोकाक मध्ये दिवसभर सुरू होती. यामुळे रमेश जारकीहोळी हे जिल्हा पंचायत मध्येही ऑपरेशन कमळ राबविणार आहेत. रविवारी किंवा सोमवारी गोकाकमध्ये ता. पं. सदस्यांचे काम पुर्ण झाल्यानंतर जिल्हा पंचायत मध्येही बदलाचे वारे वाहणार आहेत. एखाद्यावेळेस जि. पं. सदस्यांनी कॉंग्रेसला हात दिल्यास तेथील सत्ता समिकरणे बदलणार आहेत.