|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ज्येष्ठ तेनुसार स्वच्छता कर्मचाऱयांना बढती देण्यास टाळाटाळ

ज्येष्ठ तेनुसार स्वच्छता कर्मचाऱयांना बढती देण्यास टाळाटाळ 

प्रतिनिध~ बेळगाव

महापालिकेत काम करणाऱया ‘सी’ आणि ‘डी’ श्रेणीतील कर्मचाऱयांची ज्येष्ठता यादी तयार करून त्यांना बढती देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बजावला होता. याची अंमलबजावणी करण्याचा आदेश नगर प्रशासन आणि जिल्हाधिकाऱयांनी महापालिका आयुक्तांना बजावला आहे. पण आदेश बजावून महिना होत आला तरी अद्याप कर्मचाऱयांना बढती देण्यात आली नाही. यामुळे कर्मचाऱयांची ज्येष्टता तयार करण्याकडे दुर्लक्ष करण्यामागचे गौडबंगाल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

जिह्यात स्वच्छता सेवा बजावणाऱया आणि महापालिकेत काम करणाऱया ‘सी’ आणि ‘डी’ श्रेणीतील कर्मचाऱयांना बढती देण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ‘सी’ आणि ‘डी’ श्रेणीतील कर्मचाऱयांना बढती देवून रिक्त पदावर नियुक्त करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दि.10 मे 2019 रोजी बजावला होता. त्यामुळे राज्य शासन, नगर प्रशासन खात्याने जिल्हाधिकाऱयांना पत्र पाठवून कर्मचाऱयांची ज्ये÷तेनुसार यादी तयार करून रिक्त पदावर नियुक्त करण्याची सुचना केली होती. यामुळे जिल्हाधिकाऱयांनी महापालिका आयुक्तांना याबाबत दि.12 ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून एक महिन्यात ज्ये÷ता यादी तयार करण्याची सुचना केली होती. पण अद्यापही ज्ये÷ता यादी करण्यात आली नसल्याचा आरोप स्वच्छता कर्मचारी संघटनेने केला आहे. सर्वोच्च न्यायालयासह नगर प्रशासनाच्या आदेशाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सदर आदेशाची अंमलबजावणी तातडीने करून रिक्त जागा भरण्यासाठी ‘सी’ आणि ‘डी’ श्रेणीच्या कर्मचाऱयांची ज्ये÷ता यादी तयार करण्याची मागणी होत आहे.

Related posts: