|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विहिंप-बजरंग दलतर्फे आज रक्तदान शिबिर

विहिंप-बजरंग दलतर्फे आज रक्तदान शिबिर 

कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ आयोजन

प्रतिनिधी / बेळगाव

विश्व हिंदू परिषद-बजरंग दल बेळगावतर्फे रविवार दि. 3 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात भवन, शास्त्राrनगर येथे सकाळी 9 वा. शिबिराचे उद्घाटन होणार आहे. अयोध्या येथे शहीद झालेल्या कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 7 पासून नावनोंदणी सुरू होणार आहे.

 कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी आणि हुक्केरी मठाचे डॉ. चंद्रशेखर स्वामीजी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत शिबिर होणार आहे. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद-बजरंग दलतर्फे करण्यात आले आहे.

Related posts: