|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मिरवणुकीव्दारे चांदीचे कवच मंदिरात

मिरवणुकीव्दारे चांदीचे कवच मंदिरात 

प्रतिनिधी/ बेळगाव

बाजार गल्ली, वडगाव येथील पुरातन व जागृत देवस्थान असणाऱया श्री मारूती मंदिरातील मूर्तीला चांदीचे कवच धारण करण्यात येणार आहे. रविवार दि. 3 रोजी सकाळी 7 वा. हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान चांदीचे कवच शनिवारी मंगल वाद्याच्या गजरात मिरवणुकीने आणण्यात आले. कवच मिरवणुकीत वडगावातील नागरिक व भाविक सहभागी झाले होते.

वडगाव येथील जेल शाळेसमोरून मिरवणुकीस सुरूवात करण्यात आली. वडगाव-टिळकवाडी रोड, येळळूर क्रॉस, रामदेव गल्ली राममंदिर, सोनार गल्ली, तेग्गीन गल्ली, धामणे रोड, चावडी गल्ली, बाजार गल्ली मार्गे चांदीचे कवच मंदिरात आणण्यात आले. मिरवणुक मार्गावर भाविकांनी स्वागत केले. श्री मारूती देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष यल्लाप्पा बेन्नाळी पाटील, सुरेश पिळणकर, राजेश कुबसद, रमेश पाटील, सुदेश पाटील, संजय मुतालिक, भटजी अजित कुलकर्णी, निर्मला कामकर, बंगोडी, पतंजली योगा शिक्षण समितीच्या महिला सदस्या आणि भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

रविवारी सकाळी 7 वा. कवच शुध्दीकरण व अभिषेक करून श्री मारूती मुर्तीस धारण करण्यात येणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे ट्रस्ट कमिटीने कळविले आहे.

 

Related posts: