|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेतकऱयांच्या विरोधामुळे सर्व्हे अधिकाऱयांचा सावध पवित्रा

शेतकऱयांच्या विरोधामुळे सर्व्हे अधिकाऱयांचा सावध पवित्रा 

प्रतिनिधी/ बेळगाव

रिंगरोडचा सर्व्हे करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी विविध ठिकाणी जाऊन सर्व्हे करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र शेतकरी त्याला विरोध करत आहेत. शेतकऱयांना नोटीस देऊन सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकरी जागरुक होऊन संघटितपणे विरोध करत आहेत. यामुळे आता हे सर्व्हेचे अधिकारी सावध पवित्रा घेत आहेत. त्यांच्याकडून अचानकपणे सर्व्हे करण्याची शक्मयता आहे. तेव्हा शेतकऱयांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

तालुक्मयातील जवळपास 31 गावांतील जमिनी रिंगरोडसाठी घेतल्या जाणार आहेत. याबाबत नोटीफिकेशन देण्यात आले. या नोटीफिकेशनला शेतकऱयांनी उत्तर दिले. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असे सांगितले. तरी देखील त्या विरोधातच प्रांताधिकाऱयांनी निकाल दिला. आता एक एक गावाला नोटिसा देऊन सर्व्हे करणार असल्याचे सांगत आहेत. नोटीस येताच शेतकरी संघटितपणे त्याला विरोध करू लागले आहेत. शेतकऱयांच्या या विरोधासमोर अधिकाऱयांना नमते घ्यावे लागत आहे.

शेतकऱयांच्या या विरोधामुळे अधिकारी आता सावध झाले आहेत. उचगाव, संतिबस्तवाड गावातील शेतकऱयांनी रिंगरोडविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली आहे. आणखी काही गावांचे शेतकरीही स्थगिती मिळविण्यासाठी धडपडू लागले आहेत. त्यामुळे त्यामध्ये आडकाठी घालण्यासाठीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. तरीदेखील कायद्याच्या चौकटीत शेतकरी लढाई लढण्याच्या तयारीत आहेत.

आता अधिकारी अचानकपणे सर्व्हे करण्याची शक्मयता आहे. पोलीस बळाचाही वापर होण्याची शक्मयता आहे. तेव्हा शेतकऱयांनी संघटित राहून विरोध करणे, याचबरोबर न्यायालयीन लढा देणे गरजेचे आहे.   

Related posts: