|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सदाशिवनगर येथील नाला गायब होण्याच्या स्थितीत

सदाशिवनगर येथील नाला गायब होण्याच्या स्थितीत 

प्रतिनिधी/ बेळगाव

सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाला गेली काही वर्षे विकासापासून वंचीत आहे. यासंदर्भात महानगरपालिकेला अनेकदा अर्ज विनंत्या, तक्रारी करुनदेखील अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. हा नाला झाडाझुडपांनी वेढला गेला असल्याने दिसत नाही. त्यामुळे तो गायब होतो की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

 शिवाय आसपासच्या नागरिकांकडून झाडाचा पालापाचोळा व कचरा या नाल्यात टाकला जातो. त्यामुळे नाला परिसरात दुर्गंधी पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 दिसवेंदिवस हा नाला अरुंद बनत चालल्याने त्याचे अस्तित्वच धोक्मयात आले आहे. यावर्षी पावसाने सर्वत्रच कहर केला. यावेळी या नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात शिरुन नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. सदाशिवनगरबरोबरच नेहरुनगर परिसरातील बरेच पाणी या नाल्याला येते.  आधीच हा नाला अरुंद झाल्याने पावसाचे पाणी नाल्याबाहेर येत आहे. या नाल्याला लागूनच महापालिकेची खुली जागा आहे. तेथे बगीचा करण्याची लोकप्रतिनिधींची मागणी आहे. तत्पूर्वी महानगरपालीकेने नाल्याचा विकास करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे..

Related posts: