|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » खंडाळ्याजवळ ट्रकने उडवली 8 वाहने, 3 गंभीर

खंडाळ्याजवळ ट्रकने उडवली 8 वाहने, 3 गंभीर 

खंडाळा : वार्ताहर

सातारा जिल्ह्यातील खंबाटकी बोगद्याजवळील ब्लॅक स्पॉट एस कॉर्नरला कंटेनर पलटी झाला. तो कंटेनर बाजुला काढत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने पुढे थांबलेल्या वाहनांना धडक दिली. यामध्ये वाहतूक पोलीस सुनिल शेलार (वय 50) हे मालट्रक कारच्यामध्ये अडकून गंभीर जखमी झाले. पलटी कंटेनरचा चालक हणमंत रामचंद्र शिंदे (वय 25) रा.जत (सांगली), क्लिनर सागर अरुण पाटील (वय 19) रा .आळेगांव जि. सोलापूर हे गंभीर जखमी झाले.

खंबाटकी बोगदयानंतर तीव्र उतार आहे. या दरम्यान एस आकाराच्या वळणावर आज (ता. 3) सकाळी सातच्या सुमारास कंटेनर क्र. MH O6 AQ 8923 च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला. हा रस्त्यात असलेला कंटेनर क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढून वाहतुक सुरळीत करण्यासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवली होती. पुढे अनेक कार थांबल्या होत्या. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतुक पोलीस तेथे उपस्थित होते.

दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगात ट्रक (KA 26 6447) ने पुढे थांबलेल्या वाहनांना चिरडले. दरम्यान मालट्रक कारच्यामध्ये हवालदार सुनिल विठ्ठल शेलार हे चिरडले. या अपघातात शेलार यांचा उजवा पाय मोडला. तर ट्रक चालक गंभीर जखमी झाले. जखमींना खंडाळ्यात खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related posts: