|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुणे : 1 लाख 36 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पंचनामे सुरू

पुणे : 1 लाख 36 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पंचनामे सुरू 

ऑनलाईन टीम / पुणे :

अवकाळी पावसामुळे पुणे विभागात अंदाजे 1 लाख 36 हजार 148 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, येत्या पाच दिवसात पंचनाम्याचे काम पूर्ण होईल आणि लवकरात लवकर शेतकऱयांना मदत केली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

म्हैसेकर यांनी दोन दिवस सोलापूर व सांगली जिह्याचा पाहणी दौरा केला. याविषयी बोलताना ते म्हणाले, सांगली जिह्यात 65 हजार 267 हेक्टर, सोलापूर जिह्यात 36 हजार 345 हेक्टर, पुणे जिह्यात 21 हजार 681 हेक्टर, सातारा जिह्यात 11 हजार 800 हेक्टर व कोल्हापूर जिह्यात 1 हजार 55 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या जिह्यांचे प्रामुख्याने सोयाबीन, भात, जवारी, द्राक्ष बागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुणे विभागात एकूण 51 तालुके बाधित असून, एकूण 1 लाख 36 हजार 148 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सांगली, सोलापूर व सातारा जिह्यातील काही भागातील गावांना भेटी देत आपण पाहणी केली. या सर्व भागांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू असून, पुन्हा पाऊस आला नाही तर हे पंचनामे येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील, हे पंचनामे करत असताना जिओ टॅगिंग फोटो काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत. किती क्षेत्र बाधीत झाले आहे, याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या पिकाचा विमा काढलेला आहे, त्याबाबतही आम्ही वेगळी माहिती घेवून त्या शेतकऱयांचे पंचनामे करून घेत असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले.

Related posts: