|Friday, December 13, 2019
You are here: Home » क्रिडा » बार्सिलोनाचा पराभव

बार्सिलोनाचा पराभव 

वृत्तसंस्था/ व्हॅलेन्सिया

ला लिगा विजेत्या बार्सिलोना संघाला शनिवारी येथे झालेल्या फुटबॉल सामन्यात लिव्हेंटीकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात लिव्हेंटीने बार्सिलोनाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला.

सदर स्पर्धेत बार्सिलोनाचा हा तिसरा पराभव असून या पराभवानंतरही बार्सिलोनाने गुणतक्त्यात 11 सामन्यांतून 22 गुणांसह आघाडीचे स्थान राखले आहेत. गेल्या आठवडय़ात बार्सिलोनाने या सपर्धेत रियल व्हॅलेडोडीडचा 7-1 असा पराभव करून गुणतक्त्यात पहिले स्थान घेतले होते. शनिवारच्या सामन्यात लिव्हेंटीने केवळ उत्तरार्धात 7 मिनिटांच्या कालावधीत 3 गोल नोंदविले. बार्सिलोनातर्फे एकमेव गोल 38 व्या मानिटाला मेसीने नोंदविला. लिव्हेंटीतर्फे 61 व्या मिनिटाला जोस कँपेनाने, 63 व्या मिनिटाला मेरॉलने आणि 67 व्या मिनिटाला रेडोजाने गोल केले.

Related posts: