|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » क्रिडा » दुखापतीमुळे नदाल पॅरीस मास्टर्स स्पर्धेतून बाहेर

दुखापतीमुळे नदाल पॅरीस मास्टर्स स्पर्धेतून बाहेर 

वृत्तसंस्था/ पॅरीस

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पॅरीस मास्टर्स पुरूषांच्या खुल्या टेनिस स्पर्धेतून स्पेनच्या माजी टॉप सीडेड राफेल नादालला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. शेपोव्हॅलोव्ह आणि सर्बियाचा जोकोव्हिक यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.

शनिवारी नादाल आणि कॅनडाचा शेपोव्हॅलोव्ह यांच्यात उपांत्य सामना आयोजित केला होता पण या सामन्यापूर्वीच नादालला पोटाच्या विभागाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. शेपोव्हॅलोव्हला अंतिम फेरीसाठी पुढेचाल मिळाली. दुसऱया उपांत्य सामन्यात सर्बियाच्या जोकोव्हिकने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचा 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. 10 नोव्हेंबरपासून लंडनमध्ये होणाऱया 2019 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या एटीपी टूरवरील अंतिम स्पर्धेत नादालच्या सहभागाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. या दुखापतीमुळे नादालची मास्टर्स स्पर्धेतील 34 वे विजेतेपद मिळविण्याची संधी हुकली आहे.

Related posts: