|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारचा कोकण

सातारचा कोकण 

प्रतिनिधी/ सातारा

कोकणची माणसं म्हणजे फसणासारखी असतात…आतून गोड गऱयासारखी मायाळू…बाहेरुन काटेरी अशी म्हण आपल्या मराठीत म्हण आहे. त्याच म्हणीचा प्रत्यय साताऱयात कोकणातून गेल्या तीन ते चार पिढय़ापूर्वी कोकणातून साताऱयात आलेल्यांनी आपलं पक्क स्थान निर्माण केले आहे. त्यांनी साताऱयांचाच कोकण करत ‘माका सातारा कोकण आसा’ असे म्हणून आपल्या कोकणी परंपरा कायम जपत मातीशी नाळ आजही घट्ट आहे. पारंपारिक उत्सव अगदी कोकणी पद्धतीने साताऱयात साजरे केले जातात. एकीचा फंडा यांच्यामध्ये असून त्यांनी सुमारे तीस वर्षापूर्वी माची पेठेतल जागा घेवून घरे बांधली आहेत. घरे जरी डोंगरपायथ्याला असली तरीही लगतच झाडांचा लळा त्यांनी लावून फणस, नारळ, आंबा अशी कोकणीच झाडे लावली आहेत. 

मुळचे सातारा शहर छत्रपती शाहु महाराजांनी वसवलेले आहेत. त्यानंतर शहराचा विस्तार वाढत गेला आहे. शहरात कोकणातून नोकरी,कामानिमित्ताने साताऱयाला ऐतिहासिक काळापासून लोक येत होते. चार पिढय़ापूर्वीही असेच कोकणातुन रत्नागिरी जिह्यातील लांजा, संगमेश्वर, दाभोळ या तालुक्यातून येवून स्थायिक झाले. कुठे कोणाच्या हॉटेलमध्ये काम तर कोणाच्या बांधकामावर बिगाऱयाचे काम, मिळेल ते काम करुन कोकणी कुणबी समाज साताऱयात एकीने रहात आहे. आज चौथ्या पिढींची लोकसंख्या सुमारे दोन हजारच्या आसपास आहे. गेल्या तीस वर्षापूर्वी कोकणी माणसांनी एकत्र येवून माची पेठेत जागा खरेदी करुन आपली घरे बांधली आहेत. घरे बांधतानाही तेथे रस्ता नव्हता. काशी विश्वेश्वर मंदिराच्या जवळ घराच्या बांधकामाचे साहित्य आणले जायचे तेथून गाढवाच्या सहाय्याने पोहचवले जात होते. समाजाचे उपक्रम राबवण्याकरता कोकणरत्न सांस्कृतिक कुणबी समाज संघ स्थापन केला आहे. दशभुजा गणपती मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. देवदिवाळी, शिमगा, होळी हे सण कोकणी पद्धतीने साजरे केले जातात.

Related posts: