|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » श्री राम मंदिरातील काकड आरतीला होतेय गर्दी

श्री राम मंदिरातील काकड आरतीला होतेय गर्दी 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

गुलाबी थंडीमध्ये भक्तिमय वातावरणात येथील मुख्य बाजारपेठेतील श्री राम मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने काकड आरतीचा कार्यक्रम दररोज पहाटे होतो. या सोहळ्यासाठी महिलांसह अबालवृद्धांची गर्दी होताना दिसत असून या हरीभाजनाच्या भक्तिमय वातावरणात लोक न्हाऊन निघत आहेत.

 गेली अनेक वर्षांपासून येथील श्रीराम मंदिरामध्ये काकड आरतीचा कार्यक्रम होत असून दररोज पहाटे सहा वाजता मंदिरातील विठ्ठल रखुमाई च्या मूर्तीस अभ्यंगस्नाने या कार्यक्रमास सुरुवात होते. अभिषेक, भजन व आरती असा भक्तिमय सोहळा पारंपरिक पद्धतीने सुरु आहे. येथील माऊली भजनी मंडळाच्या सहकार्याने कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत एक महिना दररोज पहाटे अभिषेकासह धार्मिक कार्यक्रमाने भजनास सुरुवात होते. काकड आरतीने कार्यक्रमाची सांगता होते. या कार्यक्रास महिला वर्ग, अबाल वृद्धांसह तरुणांचा लक्षणीय सहभाग असतो. पर्यटनास आलेले पर्यटक देखील कार्यक्रमास हजेरी लावतात. 

 दररोज येथील भाविकांच्यावतीने मंदिरात येणाऱया भक्तांसाठी प्रसादाचे देखील वाटप केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा माऊली भजनी मंडळाने अविरत  सुरु ठेवली आहे. कार्यक्रमाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेदिवशी मंदिरामध्ये आकर्षक दिव्यांची रोषणाई, उत्कृष्ठ रांगोळी, महाप्रसादाने होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यसाठी दिलीप शिपटे, प्रभाकर देवकर, कृष्णकांत पवार, दत्ता सुतार, नितीन चौरसिया, शिरीष गांधी, गजानन धोत्रे, संजय जंगम, सुरेश उगले, संदीप देवकुळे, लक्ष्मण कदम, सचिन धोत्रे, काशिनाथ केंडे, अनिल लोहार, श्रीकांत जाधव तसेच महिलांमध्ये माजी नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल, रमा पल्लोड, माधुरी धोत्रे, पार्वती लोखंडे, जोशीबाई, सीमा गांधी, रतन उगले, सुनंदा कुंभारदरे, सुनीता कुंभारदरे, सौ भांगडिया, विमल शेटे, शिल्पा पोतदार, विदुला जोशी, मंगल शेटे-पाटील, स्वाती शिपटे हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असतात.                 

Related posts: