|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 20 हजारांहून अधिक युवक भरतीला हजर

20 हजारांहून अधिक युवक भरतीला हजर 

बेळगाव / प्रतिनिधी

महार बटालियन, पॅरा बटालियन मद्रास बटालियनमध्ये शिपाई, क्लार्क टेडमन पदासाठीची भरती प्रकिया बेळगावमध्ये राबविली जात आहे. यामध्ये सोमवारी कर्नाटक केरळ राज्यातील उमेदवारांना संधी देण्यात आली होती. 20 हजारहून अधिक युवक या रॅलीमध्ये सहभाग झाले होते. त्यामुळे रात्री 2 वाजल्यापासूनच भरतीला प्रारंभ करण्यात आला. 30 ऑक्टोबरपासून या भरतीला सुरूवात झाली. प्रत्येक राज्यानुसार ही भरती प्रकिया राबविण्यात आली. सोमवारी कर्नाटक केरळ राज्यासाठी भरती झाली. तर मंगळवार दि. 5 नोव्हेंबर ट्रेडमनपदासाठी भरती होणार आहे. दि. 6 ते 9 या दरम्यान कागदपत्रांची तपासणी, वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

कर्नाटकातील युवकांना संधी असल्यामुळे रविवारी दुपारपासून रेल्वे, बसने युवक शहरात दाखल होत होते. त्यामुळे एरव्ही शुकशुकाट असणाऱया कॅम्प भागात रविवारी रात्री युवकांची वर्दळ दिसून येत होत होती. होणारी गर्दी लक्षात घेवून आयोजकांनी रात्री 2 पासून भरतीला सुरूवात केली. थोडय़ा थोडय़ा मुलांना सोडून त्यांची धावण्याची स्पर्धा घेण्यात येत होती. 30 रोजी झालेला गोंधळ पुन्हा होवू याची खबरदारी आयोजकांनी घेतली असल्याचे दिसून आले. संघटनांकडून युवकांना अल्पोपहार 20 हजारहून अधिक युवक भरतीसाठी बेळगावमध्ये आल्याने त्यांना मिळेल तेथील अन्न खावे लागत होते.

Related posts: