|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » अहमदनगर : ‘हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुप’ तर्फे 10 रुपयांत थाळी सुरू

अहमदनगर : ‘हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुप’ तर्फे 10 रुपयांत थाळी सुरू 

ऑनलाइन टीम / अहमदनगर : 

विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वस्तातील थाळय़ा अद्याप सुरू व्हायच्या आहेत. मात्र, नगर शहरातील ‘हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुप’ मार्फत दहा रुपयांत पोटभर जेवण देणारे अन्न छत्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. नगरमधील संवेदनशील व्यापारी, सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आदींनी एकत्र येवून हा उपक्रम सुरू केला आहे.

नगर शहरातील प्रेमदान चौकातील नोबल हॉस्पटिल परिसरात हनुमान हिंद सेवा प्रतिष्ठान संचलित हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपचा अवघ्या दहा रुपयांत भरपेट जेवण देणारा उपक्रम सुरू झालेला आहे. यासाठी राजेंद्र (बाळूशेठ) मालू यांनी स्वतःची जागा दिली आहे. या जागेत पर्त्र्याची मजबूत शेडही उभारून दिली आहे. ग्रुपचे सदस्य वर्गणी जमा करून रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणतात. याठिकाणी अतिशय स्वच्छ वातावरणात चांगल्या प्रतीच्या तांदळाचा गरमागरम भात व चविष्ट सांबार तयार केले जाते.

शनिवार वगळता आठवडाभर सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत हा उपक्रम सुरू असतो. यासाठी राजेंद्र (बाळूशेठ) मालू, महावीर कांकरिया, संगिता भोरे, संजय खेंडे, बाळासहोब (नाना) भोरे, श्रीनिवास खुडे, नंदेश शिंदे, किशोर कुलकर्णी, अपर्णा खुडे यांच्यासह अनेक जण स्वयंस्फूर्तीने मदत करतात. प्रत्येक जण वेळ मिळेल त्याप्रमाणे या केंद्रावर येवून जबाबदारी सांभाळत असतो.

 

Related posts: