|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » आयपीएल अधिक रोमांचक : आता कधीही बदला खेळाडू…

आयपीएल अधिक रोमांचक : आता कधीही बदला खेळाडू… 

ऑनलाइन टीम / दिल्ली : 

आयपीएलमध्ये नवा बदल करण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) विचार आहे. पुढील आयपीएल पर्वात ‘पॉवर प्लेअर’चा नियम लागू करण्याची योजना बीसीसीआयनं आखली आहे. या नव्या नियमानुसार, एखादा संघ सामन्यादरम्यान, खेळाडू बाद झाला किंवा षटक संपल्यानंतर खेळाडू बदलू शकतो.

या नियमामुळं प्रत्येक संघात 15 खेळाडूंची निवड होऊ शकते. त्यामुळं 11 खेळाडू मैदानावर असतील आणि 4 खेळाडू प्लेयिंग इलेव्हनमध्येच असतील पण संघात त्यांना गरज पडेल तसे, घेण्यात येईल. याआधी फक्त क्षेत्ररक्षण करण्यासाठी फक्त इतर खेळाडू उतरत होते, आता हे चार खेळाडू बदली खेळाडू म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी उतरतील.

दरम्यान, बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुली यानं क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. याआधी डे-नाईट कसोटी सामन्याला मंजूरी देत गांगुलीनं मोठा निर्णय घेतला. बांगलादेश विरोधात भारत पहिला डे-नाईट सामना खेळणार आहे. त्यानंतर गांगुलीनं भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला टी-20 सामन्याला झालेल्या विरोधातनंतरही दिल्लीतच सामना खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं गांगुलीच्या अध्यक्षतेखाली क्रिकेटमध्ये मोठे बदल होत आहेत.

 

Related posts: