|Monday, December 16, 2019
You are here: Home » उद्योग » जगातील 500 कंपन्यांमधील कोटय़वधी युजर्स खाती हॅक

जगातील 500 कंपन्यांमधील कोटय़वधी युजर्स खाती हॅक 

सायबर सिक्युरिटी फर्मच्या अहवालातून स्पष्ट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सध्या सायबर गुन्हय़ात प्रचंड वाढ होत असून, कोणत्याही वापरकर्त्यांचा डेटा सध्या हॅकर अगदी सहजतेने हॅक करत आहेत. हॅकर्स त्यासाठी वापरकर्त्याची संपूर्ण माहिती घेत त्याचा पासवर्ड चोरी करतात. अशा गोष्टींची चोरी हॅकर्स करतात ज्या गोष्टी एखाद्याच्या विरोधात कटकारस्थान रचण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. पण हॅकर्सला काहीवेळेस वापरकर्त्याचा पासवर्ड हॅक करणे सोपे होते. कारण आपल्या पासवर्डबाबत काहीजण अधिक निष्काळजीपणाने वागतात. याबाबत सायबर सिक्मयुरिटी फर्म (इम्म्युनिवेब) यांनी केलेल्या एका नव्या संशोधनानुसार, जगातील 500 प्रसिद्ध कंपन्यांमधील कोटय़वधी वापरकर्त्यांची खाती हॅक करण्यात आली आहेत.

सायबर सिक्युरिटी फर्मच्या अहवालानुसार, हॅक करण्यात आलेल्या अनेक वापरकर्त्यांचे पासवर्ड एकसारखेच होते. म्हणजेच वापरकर्त्यांची गोपनिय माहिती त्यांना सहज हॅक करता आली. तसेच सोप्या पद्धतीमध्ये बहुतांश खात्यांचे पासवर्ड असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे पासवर्डचा हॅकर्सपासून बचाव करण्यासाठी एकाच अनुक्रमाने येणारे अक्षर किंवा क्रमांक ठेवू नये. नेहमी  पासवर्ड अल्फा न्युमेरिक कॅरेक्टरमध्ये सेट करा. त्याचसोबत पासवर्डमध्ये एका स्पेशल कॅरेक्टरचा सुद्धा वापर करण्यात यावा.

000000, 111111, 112233, 123456, 12345678, 123456789, 1qaz2wsx, 3154061, 456a33, 66936455, 789_234, aaaaaa, abc123, career121, carrier, comdy, cheer!, cheesy, Exigent, old123ma, opensesame, pass1, passer, password, password1, penispenis, snowman, !qaz1qaz, soccer1, student, welcome.

Related posts: