|Saturday, January 25, 2020
You are here: Home » उद्योग » येस बँकेला सप्टेंबर तिमाहीत 629 कोटी रुपयाचा तोटा

येस बँकेला सप्टेंबर तिमाहीत 629 कोटी रुपयाचा तोटा 

नवी दिल्ली

  चालू आर्थिक वर्षातील सप्टेंबर तिमाहीच्या नफा कमाईचे आकडे कंपन्या सादर करत आहेत. सध्या संपत्तीमधील गुणवत्तेतील घसरण झाल्याने येस बँकेच्या एकत्रित नफा कमाईत 629.10 कोटी रुपयाचा तोटा झाला आहे. बँकेला मागील आर्थिक वर्षात समान तिमाहीत 951.47 कोटी रुपयाचा निव्वळ फायदा झाला होता. तर चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत येस बँकेला 95.56 कोटी रुपयाचा निव्वळ लाभ झाला होता. बँकेला मागील आर्थिक वर्षासोबत तुलना केल्यास उत्पन्न 8,713.67 कोटीने कमी झाले असून, चालू आर्थिक वर्षात 8,347.50 कोटीवर आले आहे.

Related posts: