|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत

कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत 

सहा महिन्यात 7 हजार 123 नागरिकांना श्वानदंश

कल्याण / प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली शहरात रात्री अपरात्री कामाहून काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या नागरिकांना भीती असते ती भटक्या कुत्र्यांची. कधी कोणता कुत्रा येईल आणि चावा घेईल याचा काहीच नेम नसतो. नागरिक आपला जीव मुठीत घेवून घर गाठतात. श्वानदंशाच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान तब्बल सात हजार 123 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी आपले लक्ष केले असून सरासरी 40 नागरिक श्वानदंशाचे शिकार होत आहेत. भटक्या कुत्र्यांची नसबंदीबाबत पालिका प्रशासनाकडून कागदी आकडे नाचवत कोटय़वधींची उधळण केली जात असली तरी कुत्र्यांची संख्या काही कमी होत नसल्याने पालिकेच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे

कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून रात्री अपरात्री कामावरून परतणाऱया  नागरिकांना त्यांचा जाच सहन करावा लागत आहे. शहरातील कचराकुंडय़ा, उकिरडा, रेल्वेस्टेशन, मंदिर परिसर, शाळा पटांगण, सोसायटी, सार्वजनिक ठिकाणी व संपूर्ण शहरात फिरताना दिसतात. कधी कोणत्या बाजूने आलेला कुत्रा चावा घेईल याचा काहीच नेम नसतो. नागरिक आपला जीव मुठीत घेवून घर गाठतात. हे कुत्रे लहान मुले नागरिकांना लक्ष करीत असल्याने नागरिकामध्ये दहशतीचे वातवरण पसरले आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने श्वान नसबंदीचा दावा केला असला तरी श्वानदंशाच्या घटना कमी झाल्या नसल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कल्याण -डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान 7 हजार 123 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. दरदिवस सरासरी 40 नागरिकांना भटके कुत्रे आपले लक्ष करत आहेत. नसबंदीवर कोटय़वधींची उधळण करत वर्षाकाठी कागदोपत्री हजारो कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा पालिकेने केला असला तरी त्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने या भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून नागरिकांची सुटका होणार की नाही असा सवाल त्रस्त नागरिकाकडून केला जात आहे.

Related posts: