|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पालिका क्षेत्रात स्वच्छतेचे तीनतेरा

पालिका क्षेत्रात स्वच्छतेचे तीनतेरा 

शहरातील स्वच्छता मार्शल गायब; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका

कल्याण / प्रतिनिधी

 शहरातील रस्त्याच्या कडेला थुंकणारे, दुर्गंधी करणारे, कचरा टाकणाऱयग नागरिकांना रोखत शहरात स्वच्छता निर्माण करण्यासाठी पालिका प्रशासनाने स्वच्छता मार्शल नियुक्त केले. मात्र, कल्याण स्टेशन परिसरातील मार्शल मागील काही दिवसांपासून गायब असून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी या मार्शलचे काम थांबविल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यामुळे स्टेशन परिसरात अस्वच्छता करणाऱयांना मोकळे रान मिळाले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने शहरातील स्वच्छतेवर नजर ठेवत अस्वच्छता करणाऱयांवर कारवाई करण्यासाठी 100 मार्शलची नेमणूक केली. या मार्शलना दोन्ही शहरातील गर्दीची ठिकाणे नेमून देण्यात आली असली तरी स्टेशन परिसरात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱयांची संख्या मोठी होती. तर दुसरीकडे कल्याण स्टेशन परिसरात नेमलेल्या मार्शलबाबत मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्यामुळे ‘क’ प्रभागातील मार्शलचे काम थांबविण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून या भागात मार्शलच नसल्यामुळे शहरात अस्वच्छता पसरविणाऱया नागरिकांवर अंकुश उरलेला नाही. सर्वाधिक अस्वच्छता स्टेशन परिसरत केली जात असल्यामुळे पुन्हा एकदा सर्व शहरालाच अवकळा आली आहे. एकीकडे अस्वच्छता करणाऱया नागरिकांवर कारवाई होत नसताना कर्मचाऱयांच्या दांडय़ा मुले शहरातील कचराही नियमित उचलला जात नसल्याची नागरिकाची तक्रार आहे.

दरम्यान पालिका प्रशासनाने 67/33 तत्त्वावर नेमलेल्या या मार्शलच्या कामाबाबत पालिका प्रशासनाला संशय होता. मात्र, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात काम करणाऱया मार्शलबाबत अधिकचे पैसे घेत असल्याचा जाणीवपूर्वक कारवाई करून दंड वसूल करत पावत्याच देत नसल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात करण्यात आल्या. याबाबत पोलिसातही तक्रारी करण्यात आल्यामुळे या मार्शलचे काम वादाच्या भोवऱयात सापडले आहे. यामुळेच मागील दोन महिन्यांपासून कल्याणच्या ‘क’ प्रभागातील मार्शलचे काम बंद करण्यात आले असून संबधित विभागातील मार्शलचे काम पुन्हा सुरू करायचे किंवा नाही याबाबत आयुक्तांकडील बैठकीत चर्चा होईल. या मार्शलची नेमणूक करताना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. या मार्शलवर आर्थिक स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्याने संबंधित मार्शलचे पोलीस व्हेरिफिकेशन रडारवर आले आहे. प्रभाग क्षेत्र अधिकाऱयांनी हे व्हेरीफिकेशन केले आहे किंवा नाही याची तपासणी करूनच या प्रभागातील मार्शलच्या नेमणुकीबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, सध्या कल्याण स्टेशन परिसरातील अस्वच्छता कायम असून नागरिकांनाही मोकळीक मिळत आहे. दरम्यान, याबाबत पालिका अधिकाऱयांना विचारले असता कल्याण स्टेशन परिसरात काम करणाऱया मार्शलविरोधात आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी आल्यानंतर त्यांचे काम थांबिण्यात आले असून आढवा बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

अस्वच्छता करणाऱयांवर कारवाई करण्यासाठी 100 मार्शलची नेमणूक

मार्शलना दोन्ही शहरातील गर्दीची ठिकाणे नेमून देण्यात आली

स्टेशन परिसरात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱयांची संख्या मोठी

स्टेशन परिसरात अस्वच्छता करणाऱयांना मोकळे रान

Related posts: