|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » क्रिडा » सुर्यकुमार यादवकडे मुंबई संघाचे नेतृत्व

सुर्यकुमार यादवकडे मुंबई संघाचे नेतृत्व 

सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धा

@ मुंबई / वृत्तसंस्था

आगामी सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय मुंबई संघाचे नेतृत्व सुर्यकुमार यादवकडे सोपवले गेले. मुंबई क्रिकेट संघटनेने आपल्या वेबसाईटवरुन सोमवारी ही घोषणा केली. आगामी मुश्ताक अली चषक स्पर्धा दि. 8 नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे.

युवा खेळाडू यशस्वी जैस्वालचा या संघात समावेश नसून तो वयोगटातील स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. याशिवाय, मध्यमगती गोलंदाज तुषार देशपांडेला आश्चर्यकारक डच्चू देण्यात आला आहे. जय बिश्ता, आदित्य तरे, सर्फराज खान, सिद्धेश लाड, मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी, फिरकीपटू शाम्स मुलाणी, धुर्मिल मटकर यांचा संघात समावेश आहे. विनायक सामंत यांचे प्रशिक्षण लाभत असलेला मुंबईचा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून शुक्रवारपासून 2019-20 हंगामाला सुरुवात करत आहे.

मुंबई संघ : सुर्यकुमार यादव (कर्णधार), जय बिश्ता, आदित्य तरे, सर्फराज खान, जयदीप परदेशी, सिद्धेश लाड, शुभम रांजणे, शाम्स मुलाणी, परिक्षित वळसंगकर, रौनक शर्मा, धवल कुलकर्णी, कृतिक हंगेवाडी, दीपक शेट्टी, अकिब कुरेशी, ध्रुमिल मटकर.

Related posts: