|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कळेत सराफी दुकानासह फ्लॅटवर दरोडा

कळेत सराफी दुकानासह फ्लॅटवर दरोडा 

वार्ताहर/ कळे

येथील कळे-बाजार भोगाव रोडवरील मेन बाजारपेठीतील प्रियांका ज्वेलर्स या सराफी दुकानावर व फ्लॅटवर चोरटय़ांनी दरोडा टाकून सुमारे आठ लाख 65 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.   यामध्ये 20 तोळे सोने व 4 किलो चांदी, 1 लॅपटॉप, डीव्हीआर सीसीटीव्ही कॅमेरे आठ असा मुद्देमाल चोरुन चोरटय़ांनी पलायन केले.

कळे बाजारपेठीत अरुण पांडुरंग पाटील (रा. मूळ गाव कळंबा, ता. करवीर) यांचे प्रियांका टॉवर्स नावाचे व्यापारी संकुल आहे. याच संकुलात प्रियांका ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. या व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर ते आपल्या कुटुंबासह रहातात. त्यांच्या फ्लॅटमधून खाली असलेल्या सराफी दुकानात उतरण्यासाठी जिना आहे. दरम्यान प्रियांका ज्वेलर्सचे मालक अरुण पाटील हे रविवारी नेहमीप्रमाणे आपल्या मुळगावी कळंबे (ता. करवीर) येथील घरी राहण्यास गेले. दरोडेखोरांनी ही संधी साधून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सराफी दुकानाचे मुख्य शटर न उघडता पहिल्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमधून सराफी दुकानाच्या मागील बाजूचा दरवाजा असे एकूण सात दरवाजे उचकटून सराफी दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने, डीव्हीआर सी.सी.टी.व्ही कॅमेरे याचबरोबर फ्लॅटमधील अरुण पाटील यांची पत्नी ऐश्वर्या पाटील यांनी घरात ठेवलेले अंगावरील दागिने याचबरोबर देव्हाऱयातील चांदीच्या मूर्ती आदी सुमारे आठ लाख 65 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला.

चोरटय़ांनी दुकानातील 20 तोळे सोने व चार किलो चांदी, एक लॅपटॉप व डीव्हीआर सी.सी.टी.व्ही कॅमेरे आठ तर फ्लॅटमधील देव्हाऱयातील चांदी व रोकड असा ऐवज लंपास केला.   

सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये एक दरोडेखोर कैद –

दरम्यान सी.सी.टी.व्ही. फुटेजमध् उंचीचा,ये एक दरोडेखोर कैद झाला आहे. त्याची उंची साधारण पावणे सहा फूट, तोंडाला पूर्ण मास्क, हातामध्ये मोजे व अंगावर जॅकेटसह हातात कटावणी घेऊन उभा असलेला दरोडेखोर  सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये एक  कैद झाला आहे.

दरोडय़ाच्यावेळी दरोडेखोरांनी दुकानात असलेला सी.सी. टी. व्ही.चा डी. व्ही.आर लंपास केला त्याच बरोबर  लँपटॉपही चोरून नेला आहे. त्यामुळे दरोडे घालणारे कितीजण होते हे तपासानंतर समजून येणार आहे.

प्रियांका टॉवर्समध्ये बालाजी कलेक्शन नावाचे कपड्यांचे दुकान आहे. या दुकानाचे मालक जितू पुरोहित यांच्या हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रियांका टॉवर्स व प्रियांका ज्वेलर्सचे  मालक अरुण पाटील यांना  सकाळी   फा

sनवरून त्याची माहिती दिली. 

 यावेळी कळे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले डक यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन तपास केला.

Related posts: