|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिह्यात 16 हजार 971 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जिह्यात 16 हजार 971 हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

शेताच्या बांधावर जावून पंचनामे घेण्याचे आदेश

प्रतिनिधी/ सातारा

पावसाने शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन शेतातच कुजून गेला आहे. भाताचे पीक तर उभेच पाण्यात झडून गेले आहे. बाजरी ताटावरच उगवून आली आहे. ज्वारीची कणसे काळी पडली असून भुईमूग उपटण्यापूर्वीच उगवला आहे. ही जिरायती शेतकऱयांची जिह्यातील अवस्था आहे. बागायती शेतकऱयांची तर वेगळी व्यथा बनली आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार सातारा जिह्यात शेतकऱयांच्या बांधावर जावून पंचनामे करण्याचे काम सध्या सुरु आहे. जिह्यातील 1496 गावांपैकी 1394 गावांतील 51 हजार 354 शेतकऱयांच्या 16 हजार 971 हेक्टर शेतीचे नुकसानीचे पंचानामे पूर्ण केले आहेत, अशी माहिती प्रभारी कृषी अधीक्षक महेश झेंडे यांनी दिली.

सातारा जिह्यात पावसाने नको केले आहे. पावसाच्या पश्चिम भागात खरीपाच्या पिकांना माना वर काढून दिल्या नाहीत. जी पिके हातातोंडाला आली होती ती शेतातच सडून जावू लागली आहेत. पश्चिम भागात भाताचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. भात काढणीला आले असताना पावसाने जोर वाढवल्याने भात खाचरात पाणी साचले आहे. शेतकऱयांना भात काढायचे कसे आणि ते झोडपणे, वाळवणे मोठे कष्टप्रद होत आहे. काही शेतकऱयांचे तर भात झडून खाचरातच वाळवण झाले आहे. भुईमूगाच्या तर शेंगा काढण्यापूर्वी उगवून येवू लागल्या आहेत. बाजरीची कणसांची तशीच अवस्था झाली आहे. शेतकऱयांना खरीप हंगाम हाती आला नाही. रब्बीचा तरी हंगाम येईल या पार्श्वभूमीवर शेते मोकळी करण्याची लगबग काही ठिकाणी सुरु आहे. मात्र, सध्या परतीच्या पावसाने शेतकऱयांच्या शेतीचे नुकसान होत आहे. त्या नुकसानीचे पंचनामे जिह्यात शासनाने दिलेल्या आदेशानुसार सुरु आहेत. सातारा जिह्यात एकही शेतकरी वंचित राहणार नाही, अशा सूचना प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक महेश झेंडे यांनी  कृषी विभागातील कृषी सहाय्यकांना दिल्या आहेत.

Related posts: