|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » शिवसेनेला कोल्हापुरातील अपक्ष आमदाराचा पाठिंबा

शिवसेनेला कोल्हापुरातील अपक्ष आमदाराचा पाठिंबा 

शिवसेनेचे संख्याबळ 64 वर 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

कोल्हापूरच्या शिरोळ मतदार संघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी काल रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेऊन शिवसेनेला आपला पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 64 वर पोहचले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून अकरा दिवस उलटले तरी देखील बहुमत मिळालेल्या भाजप-शिवसेना युतीमधील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाही. भाजप स्वबळावर लढण्याचा दावा करणार नसल्याचे काल स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजप आता वेट ऍन्ड वॉच च्या भूमिकेत आहे. मात्र, शिवसेना समसमान सत्तावाटपावर ठाम आहे.

त्याच परिस्थितीत काल रात्री कोल्हापूरच्या शिरोळ मतदार संघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला. पुढील काळात शिवसेनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी आणि कामगारांना न्याय, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि बेरोजगार युवकांना रोजगार यासारखे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी सांगितले.

Related posts: