|Thursday, December 5, 2019
You are here: Home » leadingnews » सत्तास्थापनेचा निर्णय महाराष्ट्रातच होईल : संजय राऊत

सत्तास्थापनेचा निर्णय महाराष्ट्रातच होईल : संजय राऊत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा निर्णय हा महाराष्ट्रातच होणार आहे. शिवसेनेतील आमदारांचे संख्याबळ वाढत असून, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राऊत म्हणाले, राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार यावे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांचे मत आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मला राज्यपालांकडे पाठविले होते. मी राज्यपालांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. काय खरं, काय खोटं याबाबतही राज्यपालांना माहिती दिली.

राज्यातील सत्तास्थापनेत अपक्षांची भूमिकाही महत्त्वाची आहे. कालच कोल्हापूरच्या शिरोळ मतदार संघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा निर्णय हा राज्यातच होईल आणि तो जनतेच्या मनाप्रमाणे होईल, असेही राऊत म्हणाले.

Related posts: