|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » देवेंद्र फडणवीस हे ‘मावळते मुख्यमंत्री’ : सेनेचा टोला

देवेंद्र फडणवीस हे ‘मावळते मुख्यमंत्री’ : सेनेचा टोला 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

शिवसेनेने राज्यातील सत्ता स्थापनेवरून ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप आणि त्याचबरोबर केंद्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. दिल्ली गढूळ झाल्याची टीका करत देवेंद्र फडणवीस हे मावळते मुख्यमंत्री असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी जागांच्या वाटपासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत सत्तेचं समसमान वाटप करु, यावर दोन्ही पक्षांनी संमती दर्शवली होती. त्यामुळे शिवसेनेने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. ही मागणी भाजपने अमान्य केल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

सत्तास्थापनेचा घोळ घालायचा आणि परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. नवे राज्य मोकळय़ा वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ‘कौल’ दिला आहे. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. त्यांच्या पावलावरच राज्याची पुढची दिशा ठरेल. सध्या आम्हाला चिंता आहे ती ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची, अशी चिंता व्यक्त करत शिवसेनेने भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे.

 

Related posts: