|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » कुवेती दीनार सर्वात शक्तिशाली चलन

कुवेती दीनार सर्वात शक्तिशाली चलन 

अमेरिकेचा डॉलर खूप मागे

वॉशिंग्टन : अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश असला तरीही एका बाबतीत तो देश पिछडला आहे. पण 10 सर्वात शक्तिशाली चलनांच्या यादीत अमेरिकन डॉलरचा क्रमांक 9 वा आहे. भारतीय रुपयाशी जगातील 10 सर्वात शक्तिशाली चलनांची तुलना केल्यावर निर्माण होणारे चित्र अत्यंत रंजक आहे.

sजिब्राल्टर पाउंड

जिब्राल्टरचे पाउंड या यादीत सहाव्या क्रमांकावरील सर्वात शक्तिशाली चलन ठरले आहे. एक जिब्राल्टर पाउंड सुमारे 91.12 भारतीय रुपयांसमान आहे. या चलनाचा कोड जीआयपी आहे.

sओमान रियाल

या यादीत तिसऱया क्रमांकावर ओमानचे चलन रियाल आहे. भारतीय चलनाच्या तुलनेत एक रियालचे मूल्य 183.778 रुपयांएवढे आहे. या चलनाचा कोड ओएमआर असा आहे.

sब्रिटिश पाउंड

सर्वात शक्तिशाली चलनांच्या यादीत ब्रिटनच्या पाउंडचा सातवा क्रमांक आहे. एका पाउंडचे मुल्य 91.12 भारतीय रुपयांइतके आहे. या चलनाचा कोड जीबीपी असा आहे.

sस्विस प्रँक

यादीत स्वीत्झर्लंडचे प्रँक हे चलन 10 व्या क्रमांकावर आहे. एका फ्रँकचे मुल्य सद्यकाळात 71.42 भारतीय रुपयांसमान आहे. या चलनाचा कोड जीएचएफ आहे. जगातील सर्वात धनाढय़ देशांच्या यादीत स्वीत्झर्लंडचा क्रमांक सातवा लागतो.

sबहारीन दीनार

दुसऱया क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली चलन म्हणून बहारिनच्या दिनारचा क्रम लागतो. सद्यकाळात एक बहारिन दिनार 187.91 भारतीय रुपयांसमान आहे. या चलनाचा कोड बीएचडी असा आहे. तरीही जगातील धनाढय़ देशांच्या यादीत बहारिनला 25 वे स्थान प्राप्त आहे.

sजॉर्डन दीनार

जॉर्डनचे चलन दीनारही जगातील 10 सर्वात शक्तिशाली चलनांमध्ये गणले जाते. पाचव्या क्रमांकावर असलेले हे चलन 99.66 भारतीय रुपयांसमान आहे. या चलनाचा कोड जेओडी असा आहे.

s³ाgरोपीय संघाचा युरो

युरोपीय संघात 28 देश सामील असून त्यांचे स्वतःचे स्वतंत्र चलन असूनही युरो हे सामायिक चलनही कार्यरत आहे. याचा वापर सर्व सदस्य देशांच्या नागरिकांकडून केला जातो. युरो हे जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली चलन आहे. एका युरोचे सद्यकालीन मूल्य 78.69 भारतीय रुपयांसमान आहे. या चलनाचा कोड ईयुआर आहे.

sकुवेती दीनार

कुवेतचे चलन दीनार जगातील सर्वात शक्तिशाली चलन आहे. भारतीय चलनाच्या तुलनेत एका कुवेती दीनारचे मूल्य 232.827 रुपये आहे. या चलनाचा कोड केडब्ल्यूडी असून जगातील धनाढय़ देशांच्या यादीत कुवेत चौथ्यास्थानी आहे.

sलात्विया लात

चौथ्या क्रमांकावर लात्वियाचे चलन लात आहे. एक लात सुमारे 111.978 भारतीय रुपयांसमान आहे.

Related posts: