|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भडगावला विहिरीत बुडून महिलेचा मृत्यू

भडगावला विहिरीत बुडून महिलेचा मृत्यू 

कांचन बंदी

गडहिंग्लज : भडगाव येथील कांचन शंकर बंदी (वय,35) महिलेचा गावाजवळील कामत नावाच्या शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. याची वर्दी तिचे पती शंकर बंदी (वय 38, रा. भडगाव) यांनी पोलिसात दिली आहे. सोमवारी बंदी कुटुंबीय मळणी काढण्यासाठी शेतात गेले होते. काम आटोपल्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता कांचन या दत्तू तातोबा चोथे यांच्या मालकीच्या विहिरीत बुट्टय़ा धुण्यासाठी गेली होती. तेथे पाय घसरुन अथवा तोल जाऊन विहिरीत बुडून तिचा मृत्यू झाला. बराच वेळ झाल्यानंतर कांचन परत आली नसल्याने शोध घेतला असता विहिरीकाठी बुट्टय़ा दिसल्या तर चप्पल तरंगताना आढळले. मंगळवारी सकाळी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. गडहिंग्लज पोलिसात याची नोंद झाली असून अधिक तपास हवालदार संभाजी कोगेकर करत आहेत.

Related posts: