|Friday, February 28, 2020
You are here: Home » Automobiles » ऑक्टोबर महिन्यातील कार विक्रीत मारुती सुझुकी टॉप 10 मध्ये

ऑक्टोबर महिन्यातील कार विक्रीत मारुती सुझुकी टॉप 10 मध्ये 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या कारमध्ये प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ‘मारुती सुझुकी’च्या 8 कार टॉप 10 मध्ये आहेत. त्यामध्ये मारुतीची डिझायर ही कार अव्वल ठरली आहे.

सप्टेंबर 2019 च्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ब्रेझा वगळता मारुती सुझुकीच्या प्रत्येक कारची विक्री वाढली आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये टॉप 10 कारची एकूण विक्री 1 लाख 45 हजार 878 युनिट एवढी झाली आहे, जी गेल्या वषी याच कालावधीच्या तुलनेत 16.62 टक्क्यांनी जास्त आहे.

तर मारुतीच्या सर्वाधिक विकलेल्या गेलेल्या डिझायर कारची ऑक्टोबरमध्ये एकूण 19,569 युनिटची विक्री झाली. मागील वषी ऑक्टोबरमध्ये 17,404 डिझायर विकल्या गेल्या. तर सप्टेंबर 2019 च्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये डिझायरची विक्री 24.95 टक्क्यांनी वाढली.

गेल्या वषी ऑक्टोबरमध्ये टॉप 10 कारची एकूण विक्री 1 लाख 21 हजार 947 युनिट्स एवढी होती. ऑक्टोबरमध्ये विकलेल्या टॉप 10 यादीत दुसऱया क्रमांकावर स्विफ्टचा क्रमांक लागतो. मारुतीची अल्टो आणि बलेनो अनुक्रमे तिसऱया आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. मारुतीची वॅगनआर या यादीत सहाव्या क्रमांकावर राहिली.

Related posts: