|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » रशियाकडून ‘एस -400’ लवकर मिळण्यासाठी भारत प्रयत्नशील

रशियाकडून ‘एस -400’ लवकर मिळण्यासाठी भारत प्रयत्नशील 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रशियाकडून भारताला मिळणाऱया ‘एस-400’ सर्फेस टू एअर मिसाईल प्रणाली भारताला लकरात लवकर मिळाव्यात, यासाठी भारत प्रयत्नशील आहे.

एस-400 या मिसाईलमध्ये 380 कि. मी. क्षेत्रातील लढाऊ विमान, मिसाईल आणि ड्रोन हाणून पाडण्याची क्षमता आहे. या मिसाईलसाठी भारताने रशियाला आतापर्यंत सहा हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर एस-400 भारतीय वायूसेनेच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी भारत प्रयत्नशील असून, त्यासाठी रशियाला विनंती केली जाणार आहे.

भारताने एस-400 या मिसाईलसाठी ऑक्टोबर 2018 मध्ये रशियाशी 40 हजार कोटींचा करार केला होता. एस-400 स्क्वाड्रनची डिलिव्हरी ऑक्टोबर 2020 ते एप्रिल 2023 या काळात होणे प्रस्तावित आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये होणाऱया 19 व्या भारत-रशिया सैन्य आणि सैन्य तंत्रज्ञान सहयोग आंतरशासकीय आयोगावेळी हे मिसाईल लवकर मिळावे, यासाठी चर्चा होणार आहे. राजनाथ सिंह उद्या सेंट पीटर्सबर्गमध्ये एस-400 तयार होत असलेल्या ठिकाणालाही भेट देण्याची शक्यता आहे.

 

Related posts: