|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पहिल्या नाट्यसंगीत संमेलनाची ‘भरत’नांदी

पहिल्या नाट्यसंगीत संमेलनाची ‘भरत’नांदी 

पुणे / प्रतिनिधी : 

संगीत रंगभूमी टिकविली ती सांगलीकोल्हापूररत्नागिरी आणि पुण्याने. मराठी संगीत रंगभूमीसाठी भरत नाट्य संशोधन मंदिराचे योगदान शब्दातित आहे. भरतमधील रंगमंचाला रंगदेवतेचा खर्‍या अर्थाने प्रसाद मिळाला आहे. इतर कुठल्याही नाट्यगृहातील प्रयोगापेक्षा येथे होणारे प्रयोग अधिक रंगतदार ठरतातअशा शब्दांत नाट्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांनी भरत नाट्य संशोधन मंदिरासंदर्भातील आठवणींना उजाळा दिला. अन् कळस गाठला तो नटवर्य जयंत सावरकर यांनी सादर केलेल्या तळीरामाने.

शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करीत असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर आणि रौप्य महोत्सवात पदार्पण केलेल्या संवाद पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पहिले संगीत नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले असून त्याचा शानदार आणि दिमाखदार उद्घाटन सोहळा रंगभूमीदिनी (दि. 5 नोव्हेंबर 2019) भरत नाट्य मंदिरात झाला. पहिल्या संगीत नाट्य संमेलनानिमित्ताने भरतच्या अवकाशात संगीत रंगभूमीवरील अवघे तारांगण अवतरले होतेच पण पुणेकर रसिकांची उपस्थिती लक्षणीय होती. नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नटवर्य जयंत सावरकरप्रसिद्ध लेखक सुरेश खरेकीर्ती शिलेदारफैयाज यांनी भरत नाट्य संशोधन मंदिराशी कलावंत आणि रसिक म्हणून असलेले नाते उलगडून दाखविताना संगीत नाटकाचा तो सुवर्णकाळ पुन्हा रसिकांच्या डोळ्यासमोर उभा केला.

कोहिनूर ग्रूपचे कृष्णकुमार गोयल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसेविश्वस्त रवींद्र खरेउपाध्यक्ष शिरीष फुलेसंवाद पुणेचे सुनील महाजनमराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे तसेच उपायुक्त डॉ. जगदिश पाटील हे व्यासपीठावर होते.

सुरेश खरे म्हणालेचार दशकांपासून भरत नाट्य संशोधन मंदिराच्या उपक्रमांचा मी साक्षीदार आहे. या संस्थेने जी नाट्यनिर्मिती केली ती आवर्जून पाहिली आहे. संगीत रंगभूमीचा तो सुवर्णकाळ पुन्हा आला पाहिजे. संस्थेच्या संग्रहालयात इतर कुठल्याही संस्थेकडे नाही अशा दुर्मिळ नाटकांचा खजिना आहेत्याचा लाभ नाट्यकर्मींनी करून घेण्याची आवश्यकता आहे. संगीत नाटक जीवंत राहण्यासाठी राज्य शासनाने संगीत नाटकाची निर्मिती करणार्‍या संस्थेला पहिल्या प्रयोगासाठी 50 हजारांचे अनुदान विनाअट द्यावेअशी मागणी केली. शासनाचे सहकार्य मिळाल्यास संगीत रंगभूमी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात निश्चितच पोहोचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वयाच्या दहाव्या वर्षापासून भरत नाट्य मंदिराशी असलेले नाते कीर्ती शिलेदार यांनी उलगडून दाखविले. बैठक मारुन केलेली रंगभूषासंगीत नाटकाला रसिकांचा मिळणारा प्रतिसादप्रेक्षकांची गर्दी वाढली की खुल्या नाट्यगृहात ऐनवेळी वाढविली जाणारी खुर्चांची संख्यामोकळ्या जागेत उभे राहून नाटक बघणारे प्रेक्षक अन् कलाकारांना रसिकांकडून मिळणारी टाळ्यांच्या कडकडाटातील दाद अशा असंख्य आठवणी सांगून संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ प्रेक्षकांसमोर उभा केला.

फैयाज यांनीही आठवणींना उजाळा देत भरतच्या रंगमंचावर केलेले प्रयोगत्यास रसिकांची मिळालेली दादनाटक सुरू होण्यापूर्वी लागलेला हाऊसफुल्लचा बोर्ड, ‘विच्छाचे भरतमध्ये केलेले असंख्य प्रयोग याचा आवर्जून उल्लेख केला. नटवर्य जयंत सावरकर यांनी संगीत एकच प्याला नाटकातील सादर केलेल्या प्रवेशाला रसिकांनी भरभरुन दाद दिली.

भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे संगीत क्षेत्रातील संस्था आणि कलाकारतंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. यात ललित कलादर्श (ज्ञानेश पेंढारकर)देवल क्लब सांगली (विजय कुलकर्णी)मराठी रंगभूमी (दिप्ती भोगले)नेहरू सेंटर वरळी (संचालक काझी)रंगशारदा (विजय गोखले)बालगंधर्व रसिक मंडळ (सुरेश साखवळकर)भारत गायन समाज तसेच पंडित मुकुंद मराठेवंदनाताई खांडेकरमनोज फुलंब्रिकरअंजली कानेटकरअभय पटवर्धनविरेंद्र जाधवचंदुभाऊ आणि दीपक दातेबेडेकर पेंटर यांचा सत्कार आनंद पानसेअभय जबडेकृष्णकुमार गोयलसुनील महजानफैयाजकीर्ती शिलेदारसुरेश खरेपांडुरंग मुखडेनिकिता मोघे यांनी केला.

Related posts: