|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सांगली ते पंढरपूर-नांदेड 12 रोजी विशेष रेल्वे

सांगली ते पंढरपूर-नांदेड 12 रोजी विशेष रेल्वे 

सांगली/ प्रतिनिधी

पंढरपूरच्या श्री. विठोबा आणि नांदेड गुरुद्वाराला जाणार्‍या भक्तांच्या सोयीसाठी सांगलीहून कायमस्वरूपी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रवाशांच्या प्रतिसादाची चाचपणी सुरू असून त्याचाच भाग म्हणून मंगळवार दि 12 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता सांगलीतून 12 डब्यांची रेल्वे पंढरपूर, नांदेडच्या दिशेने रवाना होणार आहे. सांगलीकरांनी त्याला प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दक्षिणमध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाने पुढाकार घेऊन व सांगलीतील विठ्ठल भक्तांची भावना लक्षात घेऊन थेट सांगली ते पंढरपूर खास रेल्वेगाडी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सोडण्याचे ठरवले आहे. या गाडीला मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने परवानगी दिली आहे. मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी पंढरपूरसांगली स्पेशल रेल्वेगाडी सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी पंढरपूरहून सुटेल. हि गाडी दुपारी 12:55 वाजता मिरज येथे पोहोचेल व त्यानंतर 1 वाजून 25 मिनिटांनी सांगली स्टेशन येथे दाखल होईल.

सांगलीपंढरपूर विशेष रेल्वे गाडी सांगली रेल्वे स्टेशन येथून दुपारी 4 वाजता रवाना होईल व मिरज येथे पोहोचेल. मिरज येथून 5 वाजून 10 मिनिटांनी निघून या गाडीचे रात्री 7 वाजून 40 मिनिटांनी पंढरपूर येथे आगमन होईल. हिच गाडी पुढे कुर्डूवाडीबार्शीलातूर मार्गे नांदेडला जाणार असल्याने शीख बांधवांचीही सोय होणार आहे. 12 डब्यांच्या गाडीत 1000 सीट्स असून किमान 700 लोकांनी प्रवास केला तर हि रेल्वे कायमस्वरूपी होऊ शकेल. रेल्वे बोर्डाला तशी खात्री पटण्यासाठी लोकांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे.

Related posts: