|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » नीरव मोदीची जामीन याचिका पुन्हा फेटाळली

नीरव मोदीची जामीन याचिका पुन्हा फेटाळली 

लंडनमधील वेस्ट मिन्स्टर न्यायालयाचा निर्णय

वृत्तसंस्था/ लंडन

भारतातील पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा चुना लावणाऱया हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडनच्या वेस्ट मिन्स्टर न्यायालयाने बुधवारी पुन्हा दणका दिला आहे. नव्याने जामिनासाठी दाखल केलेली याचिका फेटाळली असून, नीरव मोदीला तुरुंगातच रहावे लागणार आहे. गुन्हेगार आदानप्रदान कराराअंतर्गत नीरव मोदीचा ताबा मिळावा, यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीने प्रकृतीचे कारण दाखवून पुन्हा एकदा जामिनासाठी याचिका दाखल केली होती. तथापि न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. या प्रकरणाची सुनावणी मे 2020 मध्ये सुरू होणार आहे. त्याआधी जामीन मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. सध्या तो लंडनमधील कुख्यात वडसवर्थ तुरुंगात आहे. ब्रिटनच्या क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, याचिकेवर विचार केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. तथापि या सुनावणीवेळी नेमका काय युक्तिवाद केला? हे सांगण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. हा प्रवक्ता भारताच्या बाजूने सीपीएस न्यायालयात युक्तिवाद करत आहे.

Related posts: