|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पंकज चव्हाण डान्स ऍकॅडमीचा थायलंडमध्ये डंका

पंकज चव्हाण डान्स ऍकॅडमीचा थायलंडमध्ये डंका 

भैरव, शर्वनी आणि हर्षच्या नृत्याने केले घायाळ

प्रतिनिधी/ सातारा

गेली चौदा वर्ष साताऱयात नृत्याचे धडे देणाऱया पंकज चव्हाण डान्स ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धा, अनेक रियॉलटी शोमध्ये सहभागी होवून साताऱयाचे नाव केले होते. एवढेच नाही तर नुकत्याच थायलंड येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही बाजी मारली आहे. भैरव, शर्वरी आणि हर्ष या तिघांनी सादर केलेल्या नृत्याने घायाळ करुन सोडले आहे. मार्गदर्शक म्हणून पंकज चव्हाण हे स्वतः होते.

साताऱयातून पंकज चव्हाण डान्स ऍकॅडमीचे स्पर्धक आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेकरता रवाना झाले होते. त्यांना साताकरांनी शुभेच्छा दिल्या होत्या. पंकज चव्हाण डान्स ऍकॅडमी ही साताऱयातील चांगली डॉन्स ऍकॅडमी म्हणून ओळखली जाते. या ऍकॅडमीच्या माध्यमातून साताऱयात अनेक कलाकार घडवले आहेत. अनेक कलकारांनी आपली अदाकारी दाखवून देत साताऱयाचे नाव लौकीक वाढवला आहे. मार्गदर्शक पंकज चव्हाण यांनी एकदा मनावर घेतले की विद्यार्थ्यांला ते डान्समध्ये परिपूर्ण करतात. साताऱयाचे डान्सरनी चक्क थायलंडमध्ये बाजी मारली. त्यामध्ये भैरव परमार याने 13 ते 18 वयोगटात तर शार्वनी खांडके यांनी 18 वर्षावरील वयोगटात तर हर्ष पटेल याने 7 ते 13 वयोगटात पारितोषिक पटवकाले. विजेत्या स्पर्धकांचे राजमाता कल्पनाराजे भोसले, उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासह साताकरांनी अभिनंदन केले.

 

Related posts: