|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा देत ओंकारसिंगची भारत भ्रमंती

ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा देत ओंकारसिंगची भारत भ्रमंती 

18 राज्यांचा पायी प्रवास; उंब्रज येथे काँग्रेस प्रेमींनी केले स्वागत

प्रतिनिधी/ उंब्रज

     ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत उत्तराखंड येथील ओंकारसिंग ढिल्लून यांनी  भारत भ्रमंती सुरू केली आहे. जवळपास18 हुन अधिक राज्यात हाताने गाडा ओढत,पायी चालत ओंकारसिंग यांनी पाच राज्यांचा  प्रवास पुर्ण केला असून करून बुधवारी उंब्रज येथे पोहचले. यावेळी काँग्रेस प्रेमींनी त्यांचे स्वागत केले.

    ईव्हीएम हटाव देश बचाव असे चौफेर लिहिलेला लाल रंगाचा गाडा,  गाडय़ावर दोन्ही बाजूला फडकणारा तिरंगा, ईव्हीएम हटावचे  टि शर्ट परिधान करुन रस्त्याने गाडा ओढत चाललेली व्यक्ती म्हणजे हेच ते ओंकारसिंग. 

लोकसभा निवडणूक निकालानंतर ईव्हीएम संदर्भात अनेक वावटळे उठली आहेत त्यातच ईव्हीएम  हटाव देश बचावचा नारा देत उत्तरराखंड येथील ओंकारसिंग यांनी अनोखी पदयात्रा महामार्गावरुन येजा करणाया नागरीकांच्यात चर्चेचा विषय ठरली आहे.  बुधवारी उंब्रज येथे ओंकारसिंगाचे गाडय़ासह आगमन झाले. याप्रसंगी कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमंतराव जाधव यांनी सत्कार केला. यावेळी मधुकर जाधव, संदीप घाडगे, उत्तमराव अर्जुगडे, सुरेश जाधव, राजेंद्र चव्हाण, विलास घाडगे,गणेश चव्हाण उपस्थित होते.

         उत्तराखंड (उत्तर प्रदेश) येथील ओंकार सिंग ढिल्लून हे  ईव्हीएम हटाव देश बचाव 18  आँगस्ट रोजी भारत भ्रमंतीसाठी घराबाहेर पडले आहेत.  त्यांनी आतापर्यंत सहा राज्यांमध्ये पायी प्रवास केला असून महाराष्ट्र मधून त्यांचा प्रवास सुरू आहे. बुधवारी उंब्रज येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ईव्हीएम मशीन आहे त्यामुळे त्यात घोटाळा होवू शकतो असे सांगितले. नुकतेच उत्तर प्रदेश मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या येथे भाजप पक्ष तिस्रया क्रमांकावर असताना तो पहिल्या क्रमांकावर गेला आहे. हा निकाल शंकास्पद असल्याने ईव्हीएम संदर्भात लोकांच्या जागृती होवून लोकांनी ईव्हीएम हटाव साठी रस्त्यावर उतरावे यासाठी   भारत भ्रमंतीला सुरुवात केली.  आत्तापर्यंत तेवीशे कि.मीचा पायी प्रवास झाला असून आणखी सात हजार किलोमीटरचा प्रवास करून मार्च 2020 ही पदयात्रा संपणार असल्याचे ओंकारसिंग यांनी सांगितले.  हेमंतराव जाधव म्हणाले, ईव्हीएम संदर्भात देशभर जन आक्रोश सुरू आहे. ईव्हीएमच्या घोटाळ्याने काँग्रेस आणि मित्रपक्षांचा पराभव झाला आहे त्यामुळे ईव्हीएम देशासाठी घातक असून ओंकारसिंग यांनी सुरू केलेले आंदोलन स्वागतार्ह आहे.

Related posts: