|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » इजिप्तमध्ये चित्रित झाला कोकणी ‘अप्सरा धारा’

इजिप्तमध्ये चित्रित झाला कोकणी ‘अप्सरा धारा’ 

पणजी प्रतिनिधी

समृद्ध कथा तंत्रशुद्ध निर्मिती आणि उत्तम सादरीकरण पण यामुळे आता कोकणी सिनेमा हे जागतिक पातळीवर आपले स्थान बळकट करत आहे. गोवा, कर्नाटक केरळ आणि मुंबईमध्ये कोकणी सिनेमांचे आजवर चित्रीकरण होते पण ‘अप्सरा धारा’ या सिनेमाच्या माध्यमातून कोकणी सिनेमाने आता देशाचीही सीमा ओलांडली असून, संपूर्णपणे इजिप्तमध्ये चित्रित झालेला हा पहिलावहिला कोकणी सिनेमा ठरला आहे.

‘जाना माना’ आणि ‘आ वै जा सा’ यासारख्या गाजलेल्या कोकणी सिनेमांचे कर्ते रमेश कामत यांनी अप्सरा धाराची निर्मिती केली असून, सार्थक शेणॉय आणि स्वाती भट हे बेंगलोर मधील कोकणी बालकलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर डॉ. दयानंद पै, गोपीनाथ भट, पी. रोहिदास नायक आदी कलाकारांच्या यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. यशाला शॉर्टकट नसतो हे बालमनावर असणाऱया सिनेमाची निवड कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील बाल चित्रपट विभागात झाली आहे.

Related posts: