|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जोरदार पावसामुळे होंडा भागातील रस्ते पाण्याखाली

जोरदार पावसामुळे होंडा भागातील रस्ते पाण्याखाली 

वाळपई / प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयातील होंडा भागांमध्ये आज संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी आल्यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात भंबेरी उडाली. सदर भागातील गटार व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून पूर्णपणे कोलमडल्याने याचा प्रतिकूल परिणाम आज नागरिकांना भोगावा लागला. यामुळे स्थानिक पंचायत व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला.

 याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील होंडा या मध्यवर्ती ठिकाणी वाळपई होंडा दरम्यानच्या प्रमुख मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक गेल्या बऱयाच प्रमाणात व्यत्यय  निर्माण झाला. संध्याकाळी पाचच्या नंतर रात्री आठ पर्यंत मोठय़ा प्रमाणात पाऊस लागला यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते .त्याचा प्रतिकूल परिणाम चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना भोगावा लागला. त्याच प्रमाणे या भागांमध्ये फेरफटका मारला असता अनेक दुकानांच्या समोर मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा झाल्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले . अनेक वर्षापासून या भागातील गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. गटार व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हावा ह्या संदर्भाची मागणी करूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .आज याचा प्रत्यय नागरीकांना आला यामुळे स्थानिक पंचायत व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्काळजीपणा व नागरिकांनी तीव्र स्वरूपात संताप व्यक्त केला. याबाबत नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार होंडा भागातील मध्यवर्ती परिसर हा पूर्णपणे दुकानांनी व्यापलेला आहे .यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारे गटार व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे .मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे याचा मोठय़ा प्रमाणात प्रतिकूल परिणाम खासकरून पावसाळी मोसमात भोगावा लागतो .आज अशाच प्रकारची परिस्थिती प्रचंड प्रमाणात पाहावयास मिळाली. जवळपास तीन तास अनेक दुकानांच्या समोर मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी भरले होते. यामुळे ग्राहकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले .सत्तरी तालुक्मयातील पंचायत क्षेत्राच्या तुलनेत होंडा ग्रामपंचायत शेत्र हे आर्थिक दृष्टय़ा बऱयाच प्रमाणात कणखर आहे असे असताना गटार व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष न देण्याची प्रवृत्ती म्हणजे जनतेच्या समस्या संदर्भात पूर्णपणे पंचायत मंडळ गाफील असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

 

वाळपई ते होंडा दरम्यानच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी भरले होते. यामुळे खासकरून दुचाकी चालकांना याचा मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागला. दरम्यानच्या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण सातत्याने वाढत असते. यामुळे पाण्यातून नागरिकांना वाट काढीत आपल्या दुचाकी घेऊन जावे लागत होते यामुळे अनेक दुचाकीस्वारांना ाण्याच्या फवाऱयाने भिजावै लागल्यामु

Related posts: