|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » परतीच्या पावसाचा सत्तरीला तडाखा

परतीच्या पावसाचा सत्तरीला तडाखा 

भातशेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान

वाळपई / प्रतिनिधी

आज संध्याकाळी वाळपई व इतर ग्रामीण भागांमध्ये अचानकपणे पडलेल्या परतीच्या पावसाचा तडाखा मोठय़ा प्रमाणात सत्तरी तालुक्मयाला बसला आहे. खास करून भात शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून भात कापणीवेळी जमिनीवर सुकवण्यासाठी घालण्यात आलेल्या भाताचे मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली आहे.

 यामुळे भात उत्पादकांना याचा जबरदस्त फटका बसला असून येणाऱया काळात भाताच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होणार असल्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.

 याबाबतची माहिती अशी  की आज संध्याकाळी अचानकपणे सत्तरी तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात पावसाचा तडाखा बसला. तीन ते चार वाजण्याच्या सुमारास वादळी वारा व मोठय़ा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत बनले. मोठय़ाप्रमाणात पडलेल्या पाऊस व झालेल्या वादळी वाऱयामुळे नैसर्गिक स्तरावर नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे. महत्त्वाचे म्हणजे कृषी बागायतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली असून यात भात शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे. सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये भात शेती करण्यात येत असतात. सध्या शेती पूर्णपणे तयार झाली असून काही ठिकाणी कापणीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. तर काही ठिकाणी येणाऱया काळात भात कापणी होणार आहे असे असतानाच आज पडलेल्या पावसामुळे भात कापणी केलेल्या भाताचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेली आहे. तर काही ठिकाणी तयार झालेले भात वादळी वाऱयामुळे जमिनीवर पडले असून यामुळे उत्पादनावर याचा मोठय़ा प्रमाणात फटका झाल्याचे समजते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाली होती. त्याच प्रमाणे इतर अनेक ठिकाणी कृषी कृषि बागायतीचे प्रचंड प्रमाणात प्रमाणात नुकसानी झाली होती. आज पडलेल्या परतीच्या पावसामुळे कृषी उत्पादकासमोर चिंतेची स्थिती निर्माण झाली असून यापूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही सरकारने दिलेली नाही. यामुळे यंदाच्या नुकसानीलाही मोठय़ा प्रमाणात भात उत्पादकांना सामोरे जावे लागणार आहे.

Related posts: