|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्री रोजगार योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा

मुख्यमंत्री रोजगार योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा 

प्रतिनिधी/ पणजी

 मुख्यमंत्री रोजगार योजना ही सर्वसामान्य गोमंतकीय बेरोजगारांना उद्योग करण्यासाठी  चांगली संधी आहे. या वर्षी आतापर्यत 140 अर्जदारांना सुमारे 8 कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे, अशी माहिती आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

 ही योजना सहज मंजूर होते यासाठी कर्जदार युवक युवती ही स्थानिक गोमंतकीय असायला पाहिजे तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न 10 लाखाच्या वर नसावे. 18 ते 45 वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो. कमीत कमी शिक्षण 8वी पास आहे. यात अनेक उद्योगासाठी कर्ज दिले जातात. दारु व तंबाखू सारख्या व्यावसायाला कर्ज दिला जात नाही. जास्तीत जास्त कर्ज 25 लाख रुपये आहे ते उच्च शिक्षितासाठी आहे, असे तानावडे यांनी सांगितले.

तालुका पातळीवर मेळावे

 लोकांना या योजनेची माहिती मिळावी यासाठी आम्ही तालुकापातळीवर मोळावे आयोजित केले आहे. 18 नोव्हेंबर रोजी साखळी येथे रविंद भवने येथे मेळावे आयोजित केला आहे. यात सत्तरी व डिचोलीतील युवकांना फायदा होणार आहे. यात या योजनेविषयी माहिती पुरविली जाणार आहे. तसेच 5 डिसेंबर रोजी कुडचडे रविंद भवनात मेळावे आयोजित केला आहे, असे तानावडे यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री रोजगार योजना ही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरु केली होती. आतापर्यत 10 हजाराच्यावर लाभार्थिनी या योजनेचा फायदा घेतला आहे अनेक जण आतापर्यत मोठे उद्योजक या योजनेमार्फत झाले आहे. आतापर्यत 203.57 कोटी रुपये मंजूर झाले आहे. आतापर्यत 19 वर्षात 174.22 कोटी रुपये कर्जदारांना देण्यात आले आहे तर आतापर्यंत 108.6 कोटी रुपयांची पूनप्राप्ती करण्यात आली आहे असे तानावडे म्हणाले.

नवीन उद्योजकांसाठी प्रशिक्षण

 त्याचप्रमाणे ईडीसीतर्फे ‘इन्कुबेशन सेंटर ऍण्ड को वर्कीग स्पेस’ तयार करण्यात आले आहे. यात शिक्षित युवकांना उद्योजकाविषयी माहिती व प्रशिक्षण दिले जाते. अनेक जे विद्यार्थी शिक्षिण संपल्यावर उद्योग करु इच्छितात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे याला आतापर्यत चांगाला प्रतिसाद लभत आहे. यासाठी त्यांच्याकडून खूपच कमी किमंत आकारली जाते. या सेंटरवर गोव्यातील नामवंत असे उद्योजक प्रशिक्षण देत आहे त्यामुळे याचा फायदा नवीन युवकांनी घ्यावा, असे तानावडे यांनी सांगितले.

Related posts: