|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » भारताकडे सोपवल्यास आत्महत्या करेन : नीरव मोदी

भारताकडे सोपवल्यास आत्महत्या करेन : नीरव मोदी 

ऑनलाइन टीम / लंडन : 

पीएनबी बँकेला कोटय़ावधीचा चुना लावून पळालेला व हिऱयांचा व्यापारी नीरव मोदीची जामीन याचिका न्यायालयानं पुन्हा एकदा फेटाळली. जामीन याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टात नीरव मोदी संतप्त झाला. ‘जर मला भारताकडे सोपवण्यात आले तर मी आत्महत्या करेन’, अशी पोकळ धमकी कोर्टाला दिली. आपल्याला तरूंगात अन्य कैद्यांकडून मारहाणदेखील करण्यात आल्याचं त्यानं न्यायालयाला सांगितलं. यानंतरही न्यायालयानं त्याची याचिका फेटाळून लावली.

नीरव मोदीला बुधवारी वेस्टमिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात सादर करण्यात आले होते. कोर्टात मोदीचा वकील हुगो कीथ क्मयूसी देखील होते. मोदीने आतापर्यंत पाच वेळा जामीन याचिका दाखल केली आहे. त्याला सध्या दक्षिण-पश्चिम लंडन येथील वैंड्सवर्थ तुरुंगात ठेवण्यात आले आहे. भारत सरकारने विनंती केल्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली होती.

 

 

Related posts: