|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला अपघात

काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला अपघात 

पुणे / प्रतिनिधी : 

काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला काल, बुधवारी रात्री 12.30 वाजता अपघात झाला. सुदैवाने ते बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल कराडला जात असताना हा अपघात झाला. एअरबॅगमुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांच्या मर्सिडीज कारचे बरेच नुकसान झाले आहे. हा अपघात कशामुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, विश्वजीत कदम यांनी अपघातानंतर या दुर्घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मुंबईहून पुण्याला येत असताना माझ्या कारला काल रात्री पुण्यामध्ये अपघात झाला. कार झाडावर आदळली. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. मी व चालक दोघेही सुखरूप आहोत. माझ्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या असून कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही; तसेच कोणताही धोका नाही. साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी आहेतच. मी सुखरूप आहे काळजी नसावी.

Related posts: