|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » घरच्या घरी प्रयोगशील कल्पकता

घरच्या घरी प्रयोगशील कल्पकता 

घर सजवण्यासाठी खूप पैसे खर्च करून महागडय़ा वस्तूच घेतल्या पाहिजेत असा आग्रह कशाला? उलट आपण स्वतः घरासाठी काही वस्तू तयार केल्या आणि घर सजवलं, तर तो आनंद अवर्णनीय असतो. त्यात वेगळंच समाधान असतं. त्यासंदर्भाने उपयुक्त ठरू शकतील अशा काही साध्या सोप्या कल्पना इथे दिल्या आहेत. बघा त्यातल्या काही तुमच्या घराला साजेशा ठरतात का.

घरसजावट म्हटली की विविध सजावटींच्या वस्तू नेहमी आणल्या जातात आणि त्यानं घर सजवलं जातं. आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांना आणि घरातील व्यक्तींना प्रसन्न वाटण्यासाठी ही सारी खटपट आपण करत असतो. आणि आजघडीला पाहिलं तर घराची सजावट करण्यासाठी बाजारात अनेक शोभेच्या वस्तू उपलब्ध असतातही. खरं तर, त्यातली कोणतीही वस्तू आपण विकत घेऊ शकतो आणि घराचं सुशोभीकरण करू शकतो ही वस्तुस्थिती आहे.

घराची एकंदर ठेवण किंवा मांडणी बघितल्यावर त्या घरात राहणाऱया माणसांच्या आवडी-निवडीचा अंदाज बांधता येतो. आपल्या घराची सजावट करतानासुद्धा आपली आवड-निवड सजावटीतून प्रतीत होईल असे पाहावे. आपल्या आवडीची पुस्तके, कलाकृती, पेटिंग्स, आपल्या ठिकठिकाणच्या प्रवासांमधून आठवणीदाखल आणलेल्या लहान-मोठय़ा वस्तू, यांनी आपल्या घराला स्वतःचे असे व्यक्तिमत्त्व लाभते.

घराची सजावट करत असताना वस्तूंची किंवा घराची एकंदर रंगसंगती विचारात घेणे चांगले. रंगसंगतीच्या बाबतीत प्रत्येकाची आवड भिन्न असू शकते. काहींना न्यूट्रल रंग पसंत असतात तर काहींना रंगांची विविधता पसंत असते. दोन्ही प्रकारच्या रंगसंगती तितक्मयाच प्रभावी दिसतात. भिंतींना असलेल्या रंगांनुसार पडदे, फर्निचर यांचे रंग निवडावेत.

भिंतीच्या रंगाला जुळतील अशा रंगाच्या अ?Ÿक्सेसरीज म्हणजेच पडदे, फर्निचरची अपहोल्स्ट्री इत्यादी असावेत. आजकाल पडद्यांऐवजी ‘विंडो ब्लाइण्ड्स’ही लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे आवडत असल्यास पडद्याच्या ऐवजी ब्लाइण्ड्स लावण्याचा विचार करता येऊ शकेल.

अनेकांना ‘अँटीक’ म्हणजेच पुरातन वस्तूंचा सजावटीसाठी वापर करण्याची आवड असते. अशा अँटीक वस्तू घरामध्ये मांडताना वस्तूंची मांडणी काळजीपूर्वक करावी. सर्वच वस्तू एकदमच मांडण्याऐवजी थोडय़ाच वस्तू आकर्षक पद्धतीने मांडाव्यात. काही दिवसांनंतर या वस्तू काढून ठेवून त्याऐवजी आपल्या संग्रही असणाऱया इतर अँटीक वस्तूंची मांडणी करावी. अशाप्रकारे अँटीक वस्तूंमध्ये विविधताही टिकविता येईल आणि मांडणीही आकर्षक दिसेल.

मुलांच्या खोलीतही विविध प्रयोग करता येतील. मुलांची छायाचित्रे डिस्प्ले करायची असतील तर प्राण्यांच्या पॅटर्नचा वापर करा. त्याचा प्रेमसारखा वापर करून त्यात वयाच्या प्रत्येक टप्प्यावरील छायाचित्रे लावता येतील.

घरच्या घरी आपण विविध सोप्या पद्धतीची पेंटिंग प्रेम करून भिंतीवर सजवू शकतो. त्यात ग्लास पेंटिंग, वारली पेंटिंग असे पर्याय आहेत. अर्थात कुणाला वाटेल की आपण काही कलाकार नाही, मग आपण कसं काय हे करू शकू? पण खरंतर यासाठी आपण कलाकार असलं पाहिजे असा काही नियम नाही. बाजारात या पेंटिंगचा रेडिमेड साचा विकत मिळतो. त्यामध्ये दिलेल्या टिप्स आणि डमीनुसार पेंटिंग करायचे असतात. ते आपल्याला सहजपणे करता येऊ शकतात.

अनेक घरात पायऱया असतात. पायऱयांखाली लाकडी ड्रॉवर तयार करा. यात शूज, चपला ठेवता येतील. जे सामान सारखे लागत नाही ते ठेवण्यासाठीही याचा वापर करता येईल. आत काय सामान आहे ते कळणार नाही, पण ड्रॉवरच्या पायऱयांमुळे आगळा लुक नक्की येईल.

गृहसजावटीसाठी केवळ पेंटिंग वा छायाचित्रांचाच वापर करण्याची पद्धत अनेकांच्या मनात पक्की झाली आहे. मात्र, तुमची इच्छा असेल तर काही वेगळे प्रयोगही करता येतील. ज्वेलरी व अ?Ÿक्सेसरीजचा यासाठी वापर करा. हँगिंग इअररिंग्ज, माळा नेटक्मया सजवता येतील. त्यादृष्टीने दोन-तीन लाकडी बॉक्स एखाद्या भिंतीवर फिक्स करा. यावर हुक्स फिट करून कानातले व माळा लटकवा. या लाकडी बॉक्सवर काही सजावटीच्या वस्तूही ठेवता येतील. नॉबवर सर्वात आकर्षक ज्वेलरी लटकवा.

तांब्या-पितळेची भांडी आजकाल हॉलमध्ये अँटिक पीस म्हणून शोभा वाढवताहेत. त्यामुळे जरा डोकं लावून त्या वस्तू कुठं आणि कशा पद्धतीनं मांडायच्या याचा विचार करा. हंडे, गडू, ग्लास अशा वस्तू टेबलावर मांडता येतील, तर ताटं भिंतीवर लावण्याचा पर्याय आहे. ही भांडी नुसतीच ठेवणं नको असेल, तर त्याचा फुलदाणी म्हणून वापर करा. मात्र, ती नित्यनियमानं घासली गेली पाहिजेत.

अनेक घरांमध्ये, त्यात राहणाऱया लोकांची वेगवेगळय़ा निमित्ताने घेतलेली छायाचित्रे भिंतींवर लावलेली पहायला मिळतात. या छायाचित्रांशी आपल्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात हे जरी खरे असले, घराच्या सर्वच भिंतींवर लहानमोठय़ा छायाचित्रांची गर्दी टाळावी. आपली छायाचित्रे प्रदर्शित करण्यासाठी ‘डिजिटल फोटोप्रेम’चा पर्याय अतिशय सोयीचा ठरतो. त्यातूनही भिंतींवर काही छायाचित्रे लावायची झालीच तर ती मोजकी आणि शक्मयतो एकसारख्या आकाराची तसेच एकसारख्या प्रेम्समध्ये असावीत.

 

घराची सजावट करताना नानाविध टेंड्स फॉलो करण्याचा मोह टाळावा. आपल्या घराची सजावट ही आपली जीवनशैली, आपल्या आणि आपल्या परिवारजनांच्या गरजा, आपली व्यक्तिमत्त्वे आणि मुख्यतः आपली आवड लक्षात घेऊनच करावयास हवी. केवळ एखादी टेंड चलनामध्ये आहे म्हणून त्या टेंडचे अनुकरण टाळावे, तसेच आपले घर एखाद्या होम डेकोर कॅटलॉगप्रमाणे दिसायला हवे हा अट्टहासही टाळायला हवा. आणि हो, आपल्या घरामध्ये आपण सजावटीसाठी वापरत असलेल्या वस्तू सहज हाताळण्याजोग्या, सहज साफ करता येण्याजोग्या असाव्यात इतकेच!

घराची सजावट करताना अनेकदा कृत्रिम फुलांचा वापर आढळून येतो. सुरुवातीला कृत्रिम फुले आकर्षक दिसत असली, तरी कालांतराने त्यांचा रंग फिका पडतो आणि फुले जुनाट दिसू लागतात. त्यामुळे अनेकजण हल्ली घरामध्ये फुलांची सजावट करायची असल्यास ताज्या फुलांचा पर्याय प्राधान्याने निवडताना दिसतात. ताज्या फुलांची पुष्परचना अगदी लहानशी असली, तरी अतिशय आकर्षक दिसते.

कागद, कापडापासून तयार केलेली फुलं फुलदाणीची शोभा वाढवू शकतात. ही फुलं आपण घरच्या घरी सहज बनवू शकतो. त्यात पेप पेपर, ऑरगंडीचं कापड, स्टोकिंजचं कापड असे पर्याय आहेत. ही फुलं दीर्घकाळ टिकतात.

घरातील भिंतीवर लावण्यासाठी डेकोरेटिव्ह हँगिंग्स आपण घरी बनवू शकतो. आईस्क्रीमच्या कांडय़ा, मोती, विविध रंगाचे खडे, छोटी फुलं वापरून अशी हँगिंग्स बनवता येतात. त्याचबरोबर कागदापासूनही हँगिंग्स बनवता येऊ शकेल. फक्त ती वेळोवेळी स्वच्छ करायला मात्र विसरू नये.

घरातल्या शोभेच्या वस्तूंसोबत घरामध्ये लहान-मोठी फुलझाडे किंवा शोभेची झाडे आकर्षक कुंडय़ांमधून लावून त्यांची सुरेख मांडणी केली असता घर अधिक प्रसन्न दिसते. सजावट पारंपरिक पद्धतीची असो किंवा आजकालच्या आधुनिक पद्धतीप्रमाणे किंवा टेंडप्रमाणे असो, त्या सजावटीला नैसर्गिक घटकाची जोड दिल्यास सजावट अधिक परिपूर्ण होते.

घरामध्ये असलेले टेबल-लॅम्प, फ्लोअरलॅम्प, इतर लहान-मोठय़ा शोभेच्या वस्तू यांची मांडणी, तसेच गालिचे, बैठकीची एकंदर रचना वेळोवेळी बदलत राहिल्यास सजावटीमधला तोचतोपणा टाळता येतो. एरवी लक्षात न आलेल्या वस्तूही, मांडणी बदलल्यामुळे चटकन लक्ष वेधून घेतात. त्यामुळे सतत नवनवीन वस्तू खरेदी न करतासुद्धा आहे त्याच वस्तूंच्या मदतीने सजावटीमध्ये विविधता आणणे सहज शक्मय होते

-अपर्णा देवकर

.

Related posts: