|Monday, February 17, 2020
You are here: Home » leadingnews » राज्याचे नेतृत्व शिवसेनेचेच ही ठाम भूमिका : संजय राऊत

राज्याचे नेतृत्व शिवसेनेचेच ही ठाम भूमिका : संजय राऊत 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

शिवसेना आणि उद्धव ठाकरे नेहमीच अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या भूमिकेवर ठाम राहीले आहेत. खरं तर हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारायला हवा. सगळ्या आमदारांनी उद्धव ठाकरेंनी आज बैठकीत आपली भूमिका ठाम मांडली आणि त्यांच्या या भूमिकेला सर्व आमदारांनी एकमुखांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा  पुनरुच्चार शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

राऊत म्हणाले, युती तोडण्याचे काम उद्धव ठाकरे करणार नाही. तसेच राज्याचे नेतृत्व शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल या मुद्यावर उद्धव ठाकरे ठाम आहेत. निकालानंतर जी भूमिका होती तीच भूमिका आज ही आहे.

मुनगंटीवार म्हणाले होते अल्पमतातील सरकार नसणार यावर राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, का नाही असणार? 2014 मध्ये त्यांनी असा प्रयोग केला होता. पण त्यावेळेची आणि 2019 ची परिस्थिती वेगळी आहे. आता धमक्या आणि ब्लॅकमेलिंग चालत नाही. शिवसैनिक नेहमी खरेच बोलतो, दिलेल्या वचनाला जागतो, वचनाला जागतो. तो सत्तेसाठी पाठीत खंजीर खूपसत नाही. असा टोला मुनगंटीवार यांना लगावला आहे.

महायुतीला जनादेश मिळाला आहे तर सत्तास्थापन करावे असा ही टोला त्यांनी भाजपला लगावला. बहूमत नसेल तर सरळ सांगावे की आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही. जनतेला वेठीस धरण्याचे काम त्यांनी करू नये.

 

 

 

Related posts: