|Thursday, November 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » संस्कृत साहित्यातील अनमोल रत्ने (8) रघुवंशम्।

संस्कृत साहित्यातील अनमोल रत्ने (8) रघुवंशम्। 

महाकवी कालिदासाचे आणखी काही प्रसिद्ध काव्यांपैकी अखेरचे काव्य म्हणजे ‘रघुवंशम्’ होय. 19 सर्गांचे हे काव्यही श्रे÷ मानले जाते. दिलीप राजापासून अग्निवर्णापर्यंत इक्ष्वाकु कुळातील राजांचे चरित्रवर्णन या काव्यात आहे. त्यातही रघु आणि राम यांची उदात्त चरित्रे यात वर्णन केली आहेत. अत्यंत सरळ, सोप्या व रसाळ भाषेत त्याने लेखन केले आहे. ह्याची काव्यकथा खूप मोठी आहे. पण सुरुवातीला आलेली एक कथा अशी-सूर्यवंशातील एक राजा होता ‘दिलीप’. त्याचा पुत्र रघुराजा. तो अत्यंत प्रसिद्ध होता. म्हणून त्याच्या नावावरूनहा सूर्यवंश रघुवंश म्हणून प्रसिद्ध झाला. वैवस्वत मनु हा रघुवंशातील प्रथम पुरुष होता. दिलीप हा प्रजादक्ष राजा होता. त्याची सुदक्षिणा नावाची पत्नी होती. बरीच वर्षे राजा निपुत्रिक होता. त्यामुळे तो दु:खी होता. त्याचे गुरु वसि÷ होते. त्यांना भेटायचा राजाने निश्चय केला. सचिवांवर राज्य सोपवून तो पत्नीसह वसि÷ांच्या भेटीला गेला. त्यांनी त्याला निपुत्रिकपणाचे कारण सांगितले. राजा एकदा स्वर्गात गेला असता तिथे त्याने इंद्रखची सेवा केली, पण तिथे कल्पवृक्षाच्या सावलीत उभ्या असलेल्या कामधेनूकडे त्याने पाहिलेही नाही. तिला नमस्कारदेखील केला नाही. म्हणून रागावलेल्या कामधेनूने राजाला शाप दिला की, ‘तू निपुत्रिक होशील.’ तेव्हा वसि÷ मुनी म्हणाले की, तू जर कामधेनूसुता नंदिनीची सेवा केलीस, तर तुला पुत्रप्राप्ती होईल. राजाने ते मान्य करून तो पत्नीसह पर्णकुटीत राहून वानप्रस्थाश्रमासारखे जीवन जगू लागला. त्याने 21 दिवसापर्यंत जागरूकतेने नंदिनीची सेवा केली. नंदिनीने एक दिवस त्याची परीक्षा घ्यायची ठरवले. राजा हिमालयाची शोभा पाहण्यात दंग असताना गाईने एका गुहेत प्रवेश केला. एका सिंहाने तिच्यावर अचानक हल्ला केला. ती जोरात हंबरडा फोडू लागली. राजा भानावर येऊन तिचे रक्षण करण्यासाठी धावला. त्याने सिंहाला मारण्यासाठी धनुष्याला बाण लावला. पण त्याचा हात चालेना. तो सिंह म्हणजे कुंभोदर नावाचा शिवाचा सेवक होता. दोघांच्यात प्रश्नोत्तरे झाली. सिंह गाईला सोडायला तयार नव्हता. तर राजा गाईच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण देण्यासही तयार झाला. त्याने आपली मान सिंहाच्या तोंडात देण्यासाठी वाकवली. त्याचक्षणी पुष्पवृष्टी झाली. ‘मुला उठ’ असे शब्द ऐकू आले. राजाने वर पाहिले. तिथे सिंह नव्हता. नंदिनी होती. तिने मायेने सारा देखावा उभा केला होता. तिने प्रसन्न होऊन त्याला पुत्रप्राप्तीचा वर दिला. यथावकाश दिलीपराजाला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव ‘रघु’ असे ठेवण्यात आले. तेच नाव त्याच्या वंशाला मिळाले, ‘रघुवंश’. रघुवंशावर सुमारे तेहेतीस टीका लिहिल्या गेल्या. इतका तो लोकप्रिय झाला. रसपरिपोषणाच्या दृष्टीने तो सफल ग्रंथ आहे. यात सर्व रसांचा परिपाक आहे, म्हणूनच कालिदासाला ‘रससिद्धकविश्वर’ म्हटले जाते.

 

Related posts: