|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » उद्योग » भारताची 75.5 कोटी डॉलरची अमेरिकेसोबत अधिकची निर्यात

भारताची 75.5 कोटी डॉलरची अमेरिकेसोबत अधिकची निर्यात 

व्यापार युद्धाचा परिणाम 

नवी दिल्ली :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनच्या विरोधात व्यापार युद्ध मागील काही दिवसांपासून सुरु आहे. यामुळे या दोन्ही देशात व्यापारा संदर्भातील घडामोडींवर तणावाचे वातावरण असल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु यांचा फायदा भारतीय व्यापाराला मिळाला आहे. पहिल्या सहामाहीत अमेरिकेसोबत भारताकडून 75.5 कोटी डॉलरची अधिकची निर्यात वाढल्याची माहिती अमेरिकेच्या व्यापार विभागाकडून देण्यात आली आहे.

 चीनकडून करण्यात येणाऱया व्यापारावर लावण्यात येणाऱया अतिरिक्त शुल्काचा परिणाम दोन्ही देशाना सहन करावा लागला आहे. यामुळे अमेरिकेत चिनी वस्तुंची मोठय़ा प्रमाणात आयात घसरली आहे. तर याचा फायदा भारतासह अन्य देशांना झाल्याची माहिती जिनिव्हा येथे सादर केलेल्या टेड ऍण्ड ट्रेड डायव्हर्जन इफेक्ट्स ऑफ युएस टेरिफ्स ऑन चायना या विषयावर सादर केलेल्या पत्रामधून समोर आली आहे.

व्यापार युद्धात प्रत्यक्ष सहभागी नसलेल्या देशाना व्यापार युद्धाचा लाभ झाला असून पहिल्या सहामाहीत या देशांतून जवळपास 21 अब्ज डॉलरची आयात वाढलेली आहे. यात तैवान आणि मेक्सिको यांना अधिकचा लाभ झाला आहे. तर ऑफिस मशीनरी आणि अन्य दूरसंचार उपकरण क्षेत्रात चीनला सर्वाधिक नुकसान  झाले आहे. तर 2019 च्या पहिल्या सहामाहीत अमेरिकेच्या आयातीत 15 अब्ज डॉलर्सची घसरण नोंदवली आहे.

भारताचे रसायन क्षेत्र

भारताने केलेल्या निर्यातीत सर्वाधिक रसायन क्षेत्राचा व्यापार केला असून हा आकडा 24.3 कोटी डॉलरच्या व्यापाराची निर्यात केली आहे. ऑफिस मशीनरीचा व्यापार फक्त 1.8 कोटी केला आहे. संचारचा कोणताच व्यापार झाला नसून इलेक्ट्रॉनिक मशीनरी 8.3 कोटी डॉलर आणि अन्य मशीनरी 6.8 कोटी डॉलरचा व्यापार करण्यात आला आहे. 

Related posts: