|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » उद्योग » नवीन पॉलिसी विकण्यास रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सला बंदी

नवीन पॉलिसी विकण्यास रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सला बंदी 

वृत्तसंस्था /मुंबई :

रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडला आता नवीन पॉलिसी विकण्यास भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्याकडून (इरडा) बंदी घातल्याने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला मोठा झटका बसला आहे. कंपनी सध्या फक्त जुन्या ग्राहकांना आपली सेवा देऊ शकणार असल्याचेही इरडाने स्पष्ट केले आहे.

कंपनीचा राखीव निधी सरासरीपेक्षा अधिक कमी असल्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. कारण हाच फंड विमाधारकांचा पॉलिसी क्लेम करण्यासाठी वापरला जातो. ऑपरेशन ऑक्टोबर 2018 पासून सुरु केले होते परंतु ते जून 2019 पर्यंत सुधारणा होण्याऐवजी बिघडत गेले आहे. त्यामुळे कंपनी राखीव निधीचा सामान करत असल्याचे समोर आले आहे.

 

Related posts: