|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » उद्योग » सलग दुसऱया दिवशीही विक्रमाची नोंद

सलग दुसऱया दिवशीही विक्रमाची नोंद 

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सलग दुसऱया दिवशी गुरुवारी सेन्सेक्सने नवीन विक्रमाची नोंद केली आहे. निफ्टीचा निर्देशांकाने दुसऱया दिवशी 12,000 चा उच्चांक गाठला आहे. ही कामगिरी मागील पाच महिन्यानंतर केल्याची नोंद केली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धावरील चर्चेला सकारात्मक वातावरण मिळल्याने येत्या काळात व्यापारी संबंध सुधारण्यास मदत होण्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांमध्ये गुरुवारी उत्साह पहावयास मिळाला आहे.

दिवसभरातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 183.96 अंकानी वधारुन नवीन विक्रमासह 40,653.74 वर बंद झाला आहे. बीएसईमधील धातू, ऊर्जा आणि बँकिंग क्षेत्रात तेजीचे वातावरण राहिले होते. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात(एनएसई) च्या निफ्टीची घोडदौड दुसऱया दिवशी कायम राहिली असून दिवसअखेर निफ्टी 46 अंकानी वधारत 12,012.05 वर बंद झाली आहे.

सरकारकडून केलेल्या घोषणेचा परिणाम

बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिमारामन यांनी गृहनिर्माण करण्यासाठी येत्या काळात 25 हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्याचे पडसाद गुरुवारी भारतीय शेअर बाजारात तेजी राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये सन फार्मा सर्वाधिक 3.02 टक्क्यांनी नफ्यात राहिली आहे. ही तेजी कंपनीला सप्टेंबर तिमाहीत 1,064.09 कोटीचा नफा कमाई झाल्यामुळे मिळाली आहे. अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, वेदान्ता, एशियन पेन्ट्स, एचडीएफसी आणि इन्फोसिस यांचे समभाग 2.88 टक्क्यांनी वधारले आहेत. येस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, ओएनजीसी,      टाटा मोटर्स, ऍक्सिस बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि एनटीपीसी यांचे समभाग मात्र 3.27 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. बीएसईमधील मुख्य क्षेत्रात ऊर्जा, धातू, कन्झ्युमर डय़ूरेबल्स, दूरसंचार आणि हेल्थकेअर यांचे निर्देशाक 0.96 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. ऑईल ऍण्ड गॅस, कॅपिटल गुड्स, युटिलिटी आणि वाहन क्षेत्राची मात्र 0.26 टक्क्यांनी पडझड झाली आहे.

           

 

 

 

Related posts: