|Friday, February 28, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » फेसबुकद्वारे हनीट्रप : दोन सैनिकांना अटक

फेसबुकद्वारे हनीट्रप : दोन सैनिकांना अटक 

वृत्तसंस्था /जैसलमेर :

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या महिला हस्तकाच्या जाळय़ात अडकून सैन्याची माहिती उघड केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन सैनिकांना अटक केली आहे. सीआयडी इंटेलिजेन्सने पोखरणमध्ये तैनात सैनिक विचित्र बेहरा आणि रवि वर्मा यांना अटक केली आहे. अटकेनंतर बेहरला याची रवानगी 5 दिवसाच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

बेहराच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यावर गुप्तचर यंत्रणांनी त्याच्यावर नजर ठेवली होती. यादरम्यान बेहरा पाकिस्तानी हस्तकाशी फेसबुक आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे समोर आले होते. याचबरोबर सैनिक रवि वर्माही या महिलेशी जोडला गेल्याची बाब उघडकीस आली. हे दोन्ही सैनिक सीरत नावाच्या महिला हस्तकाशी संवाद साधत होते अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

बेहरा याला माहितीच्या बदल्यात पाकिस्तानी हस्तकाकडून रक्कम मिळाली होती. महिला हस्तकाने फेसबुकच्या माध्यमातून सुमारे 2 वर्षांपूर्वी मैत्री केल्याची माहिती आरोपीने चौकशीदरम्यान दिली आहे. महिलेने सर्वप्रथम फेसबुक आणि त्यानंतर व्हॉट्सऍप कॉलिंगद्वारे संवाद साधला होता. कॉलदरम्यान महिला हस्तक बोलण्यात गुंतवून सैन्यविषयक माहिती काढून घेत होती. गुप्त माहिती उघड करणे आणि त्या बदल्यात पैसे स्वीकारल्याची पुष्टी मिळाल्यावर बेहरा तसेच रवि वर्माच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गृहमंत्रालयाचा इशारा

गृह मंत्रालयाने ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करत आयएसआय हस्तक भारतीय सैनिकांना हनीट्रपमध्ये अडकवून गुप्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा इशारा दिला होता. या इशाऱयाच्या काही दिवसांतच दोन्ही सैनिकांना राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे.

 

 

Related posts: