|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » बलात्कारानंतर हिंदू विद्यार्थिनीची हत्या

बलात्कारानंतर हिंदू विद्यार्थिनीची हत्या 

कराची / वृत्तसंस्था :

पाकिस्तानात हिंदू समुदायाशी संबंधित वैद्यकीय विद्यार्थिनी नम्रता चंदानी हिची हत्याच करण्यात आली होती. अंतिम शवविच्छेदन अहवालानुसार हत्येपूर्वी नम्रतावर बलात्कार करण्यात आला होता. नम्रताचा मृतदेह 16 सप्टेंबर रोजी सकाळी तिच्या वसतिगृहातील खोलीत सापडला होता. वैद्यकीय महाविद्यालय महाव्यवस्थापनाने नम्रताने आत्महत्या केल्याचा दावा करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला होता. पण नम्रताचा भाऊ डॉक्टर विशालने तिची हत्याच झाल्याचा दावा केला होता.

अंतिम शवविच्छेदन अहवाल चांदका वैद्यकीय महाविद्यालयाने सादर केला आहे.  नम्रताच्या हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. तसेच गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती असे यात नमूद आहे. तत्पूर्वी 30 ऑक्टोबर रोजी डीएनए अहवाल प्राप्त झाला होता. यानुसार नम्रताच्या मृतदेह आणि कपडय़ांवर पुरुषाचा डीएनए आढळला होता.

नम्रताच्या हत्येनंतर पाकिस्तानात जोरदार निदर्शने झाली होती. या निदर्शनांच्या तीव्रतेमुळे सिंध सरकारने याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. सिंध उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार लरकाना जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या देखरेखीखाली हत्येचा तपास अद्याप सुरू आहे.

 

Related posts: